
डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते टायगर ग्रुप आयोजित चित्रकला स्पर्धा बक्षीस प्रदान
यावल (सुरेश पाटील) शहरातील टायगर ग्रुप तर्फे लॉक डाऊन काळात चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमधील विजेत्यांना डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते दिनांक 21 ऑगस्ट 2020 शुक्रवार रोजी बक्षीस वितरण करण्यात आले.
टायगर ग्रुप आयोजित लॉकडाऊन काळात घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचे दि. २१ ऑगस्ट २०२० रोजी बक्षीस वितरण करण्यात आले. सन्माननीय पै. तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष खान्देश अध्यक्ष ऋषिकेशबाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कुंदन फेगडे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण करण्यात आले. दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या होत्या गट १ते ५ प्रथम क्र. रिया विकास चौधरी, न्हावी द्वितीय- दर्शना लतेश बारी, तृतीय — मानस निलेश पराशर, व द्वितीय मोठागट ६ ते १०-*प्रथम क्र. रोहित विजय बारी ,द्वितीय- गितल केतन पाटील, तृतीय- राधिका सुनील उंबरकर प्रमुख उपस्थिती संदीपदादा भारंबे, भूषण फेगडे,निर्मल चोपडे हे होते.