
डॉ. जयंत नारळीकर अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष
नाशिक (तेज समाचार डेस्क). 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. आगामी साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च दरम्यान नाशिक येथे होणार असल्याच निश्चित झालं आहे.
जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात अध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू होती. मात्र साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चार तास चाललेल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर एक मत झालं. जयंत नारळीकर यांनी विज्ञानकथा, तसेच अनेक विज्ञानविषयक पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण तसेच पद्मविभूष पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.