तळोदा तालुक्यात झालेल्या वादळी पाऊसामुळे नुकसानीची पाहणी करताना खा.डॉ.हिना गावित

Featured नंदुरबार
Share This:

तळोदा तालुक्यात झालेल्या वादळी पाऊसामुळे नुकसानीची पाहणी करताना खा.डॉ.हिना गावित

 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉक्टर हिना गावित यांनी तळोदा तालुक्यातील मोड , बोरद , खरवळ आदी गावाना भेटी देऊन त्या गावात नुकसानग्रस्त,केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मोड , बोरद या गावात सर्वाधिक घरांची पडझड झाली आहे. अनेकांचे घर संसार उघड्यावर आली झाले आहेत त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी तहसीलदार विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी ग्रामसेवक तलाठी आणि नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळोदा तालुक्यात तीन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा फटका तालुक्यातील बोरद, मोड, खरवड आदी गावांना बसला आहे. काही घरांची पडझड झाल्याने अनेकांच्या संसार उघड्यावर पडला आहे. तसेच शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागात खा. डॉ.हिना गावित यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार लोमटे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नितीन वसावे, मोडचे तलाठी धनगर, ग्रामविस्तार अधिकारी राजू जाधव, ग्रामविस्तार अधिकारी एस.एस.बावा, कृषी अधिकारी नरेंद्र महाले , अमोल भारती , भरत पावरा , नंदू गोसावी , जितेंद्र पाडवी उपस्थित होते. परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडे नुकसानीची व्यथा मांडली. यावेळी खा. डॉ. हिना गावित यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *