
नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुनर्घटन करणार : डॉ. अभिजीत मोरे
नंदुरबार (वैभव करवंदकर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आघाडीची पुनर्घटन करणार आहोत. शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अभिजीत मोरे बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्र्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रिक्त होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार, नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण या पध्दतीने नियोजन करण्यात येईल. पक्षाच्या विविध आघाडी, सेल महिला आघाडी, जिल्हा, तालुका कार्यकारीणीचे पुनर्गठन होईल, यापूर्वी दुटप्पी धोरणाने आणि पक्षाच्या धोरणाविरूध्द वागणार्या काही लोकांमुळे अडचणींचा सामना करावा लागला.
पक्षाला कमी लेखणारे अन् स्वत:चे हित साधणार्यांना पक्षापासून लांब ठेवत त्यांना कुठलेही स्थान नसेल मात्र निष्ठावान आणि सक्रीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्र्रेस पार्टीच्या माध्यमातून जिल्ह्यातील चारही मतदार संघात आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणूका लढविण्याची रणनिती आखण्यात येत आहे. यामुळे कुणीही गटा तटाचे राजकारण करू नये, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत नंदुरबार जिल्ह्यात गटबाजी सहन केली जाणार नाही. तसेच भाजपाची बी टीम म्हणून असलेल्या कलंक पुसण्यात येईल.
राष्ट्रवादीत राहुन इतर पक्षांशी हात मिळवणी करणार्या पदाधिकारींची गय केली जाणार नाही. असे मोरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्र्रेस पार्टीचे सर्व सर्वा शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रांतीक सदस्य अविनाश आदीक, अर्जुन टिळे, नंदुरबार,धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभारी निरीक्षक माजी आ. अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात जोमाने कार्यारंभ होणार आहे.