
ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या नावाची पट्टी देखील नको…
ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या नावाची पट्टी देखील नको…
भोपाळ (तेज समाचार डेस्क): माजी केंद्रीय मंत्री आणि युवा नेत्ते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यनंतर खवळलेल्या काँग्रेस पक्षाने सिंधीया यांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांची हकालपट्टी केली. काँग्रेसच्या राष्ट्रीय तसेच राज्यातील नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर जहरी टीका करायला सुरवात केली. त्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसच्या कार्यलयात असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कार्यालयात असलेल्या पाटीवर देखील काँग्रेसचा राग निघाला. ज्योतिरादित्य सिंधीया यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल त्याच्या नावाची असलेली पाटी देखील काढण्यात आली.
ज्योतिरादित्य सिंधीया जेष्ठ काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचे पुत्र असून 18 वर्षांपासून ते पक्षात सक्रिय होते. 2002-2019 या काळात गुना लोकसभा मतदार संघातून ज्योतिरादित्य सिंधीया खासदार राहिले असून डॉ मनोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते ऊर्जा राज्यमंत्री राहिले. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी वादळाचा सामना करीत त्यांनी आपली जागा वाचविली परंतु 2019 साली त्यांनी आपल्या पारंपरिक मतदार संघातून पराजय स्वीकारावा लागला. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव राहिलेले सिंधिया राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी होते. .
2018 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मध्य प्रदेशात पुनरागमन केले. त्यात ज्योतिरादित्य सिंधियायांचे महत्वाचे योगदान होते. परंतु कमल नाथ यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली. कमल नाथ, दिग्विजय सिंह यांचा वाढत प्रभाव, लोकसभेत झालेला पराजय आणि अन्य कारणांमुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी वेळोवेळी आपली आपली नाराजी बोलून देखविली होती.
काही दिवसांपासून मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कमल नाथ आणि माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की, निवडणूक घोषणा पत्रात केलेल्या घोषणा पूर्ण करणे सरकारचे कर्तव्य आहे. जर जनतेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रस्त्यांवर उतरू आणि संघर्ष करू असा इशारा त्यांनी दिला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री कमल नाथ म्हणाले होते, ” रस्त्यावर उतराच “. मुख्यमंत्री कमल नाथ आणि जेष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश काँग्रेसच्या समन्वय बैठकीत देखील हजर होते.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेत मोठ्या राजकीय बदलाचा संकेत दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्या नंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.