कोरोनाला घाबरुन नका तर समजून घ्या : राजेश टोपे
कोरोनाला घाबरुन नका तर समजून घ्या : राजेश टोपे
मुंबई (तेज समाचार डेस्क): देशभरासह राज्यातही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . मात्र आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा. कोरोनाला घाबरुन नका तर कोरोनाला समजून घ्या. कोरोनाबाबत अधिक शिक्षित झाले पाहिजे, असे सांगत कोरोना मृत्यूदर रोखणे मुख्य लक्ष्य आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते .
कोरोनाला रोखण्यात यश येईलच. मात्र, त्यानंतर आपल्याला जीवन शैली बदलायला हवी. कोरोनासोबत जगायला शिकायला हवे. त्याचवेळी कोरोनाचा मुकाबला करताना कोरोना मृत्यूदर रोखणे हे मुख्य लक्ष आहे. राज्यातील जनतेला विमा कवच दिले. कोणीही घाबरुन जावू नये. कोरोना संदर्भात जरी एखादे लक्षण दिसले तरी काळजी घेत प्रथम डॉक्टरांकडे गेले पाहिजे. वृध्दापासून ते लहान मुले कोरोनातून बरे होत आहेत. तुम्ही घाबरून जावू नका. कोणती लक्षणे दिसले तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. काहीही लपवू नको. ऑक्सिजनची पातळी शेवटच्या क्षणी कमी झाली तर धोका असतो. त्यामुळे तात्काळ उपचार होण्यासाठी डॉक्टरांकडे जायला हवे, असा सल्ला टोपे यांनी यावेळी दिला.