दोंडाईचा: विना नंबर प्लेटची चोरीची अँक्टीवा गाडी फिरवतांना,दोंडाईचा पोलिसांनी तिघांना केली अटक

Featured नंदुरबार
Share This:

विना नंबर प्लेटची चोरीची अँक्टीवा गाडी फिरवतांना,दोंडाईचा पोलिसांनी तिघांना केली अटक…

बेवारस पडलेल्या पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकलचे मालक ओळख पटविण्याचे नागरिकांना आवाहन…

दोंडाईचा ( तेज समाचार प्रतिनिधि ): येथे शहरात बऱ्याच दिवसांपासून विनानंबरची चोरीची अँक्टीवा गाडी काहीजण फिरवत असल्याची गुप्त माहिती दोंडाईचा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या गोपनीय पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत पाळत ठेवत मोठ्या शिताफीने तिघांना गाडीसह ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पोलीसांच्या ह्या कामगिरीचे जनतेमधुन कौतुक केले जात आहे. तसेच दोंडाईचा पोलीसांकडून पोलीस हद्दीत विविध सापडलेल्या चोरीच्या गाडीच्या मालकांचे ओळख पटविण्याचे व कायदेशीर मार्गाने मोटरसायकल घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक १६/०६/२०२१ रोजी दोंडाईचा शहरात होन्डा अँक्टीवा ग्रे रंगाची विना नंबर प्लेटची मोटरसायकल काही मुले दोंडाईचा शहरात फिरवत असुन सदरची मोटरसायकल ही चोरीची आहे, अशी खात्रीशीर गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना मिळाल्याने त्यांनी टीम बनवत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले,गोपनीय पोलीस नाईक राकेश खांडेकर,पवन आहिरे आदींनासंबधित गाडीवर पाळत ठेवण्याचे सागितले व आज रोजी वरील वर्णनाची मोटरसायकल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ चहाच्या दुकानाजवळ लावलेली दिसली.सदर मोटरसायकल बाबत सदर ठिकाणी चौकशी करून मोटरसायकल व सदर मोटरसायकलवर आलेल्या तिघा इसमाना ताब्यात घेतले. सदर मोटरसायकलची पाहणी केली असता तिच्या डिक्कीमध्ये MH-३९-S-३३५३ अशी नंबर प्लेट मिळून आली.त्यामुळे मोटरसायकल व सदर इसमाना दोंडाईचा पोलीस ठाण्यात आणून आमच्या समक्ष चौकशी केली असता विधी संघर्षग्रस्त बालक शाहिद शहा जावेद शहा याने सदरची मोटरसायकल शहादा येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत शहादा पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता सदर मोटरसायकल चोरीबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुरनं. ६२३/२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. सदर विधी संघर्षग्रस्त बालकास त्याच्या कुटूबियांच्या स्वाधीन करून होन्डा अँक्टीवा मोटरसायकल क्रमांक MH-३९-S-३३५३ ही नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात पुढील तपासकामी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती दोंडाईचा पोलिसांनी दिली.

तसेच दोंडाईचा पोलीसांकडून पोलीस स्टेशन हद्दीत विविध मोटरसायकली जसे हिरोहोन्डा पँशन GJ 6-2151, हिरोहोंडा स्पेल्डंर GJ 5- 1796, हिरोहोंडा MP 09LE- 6817, टीव्हीएस सुझूकी MH-15-6271, हिरोहोंडा स्पेल्डंर MH-184166, टीव्हीएस सुझूकी मँक्स MP 09-5007, हीरोहोंडा स्पेल्डंर GJ-19-8047, हीरोहोंडा स्पेल्डंर नंबर नाही, हीरोहोंडा स्पेल्डंर प्लस GJ-05-7558, हीरोहोंडा स्पेल्डंर प्लस GJ-01-3143, हीरोहोंडा स्पेल्डंरMH-14-AB/5158,बजाज सीटी-नंबर नाही, यामाह MH-18-s-4391,यामाह 15-AY-6428, हीरोहोंडा स्पेल्डंर नंबर नाही, टीव्हीएस अपाची GJ-P-1234 आदी गाडीच्या मालकांना ओळख पटविण्याचे आवाहन करून कायदेशीर मार्गाने गाडी ताब्यात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *