
दोंडाईचा : पोलिस व अन्न भेसळ विभागाच्या संयुक्त कार्यवाहीने एक लाखाचा गुटखा जप्त, दोन तरूणांना अटक
दोंडाईच्यात विमल गुटख्याची सर्रास विक्री….
पोलिस व अन्न भेसळ विभागाच्या संयुक्त कार्यवाहीने एक लाखाचा गुटखा जप्त, दोन तरूणांना अटक…
याबाबत दोंडाईचा पोलिसांना अन्न भेसळ सुरक्षा अधिकारी श्री किशोर हिमंतराव बावीस्कर राहणार, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २१ जुन २०२१ सोमवार रोजी गुप्त खबऱ्यामार्फत टिप मिळाली की,दोंडाईचा शहर व परिसरात बेकायदेशीर मार्गाने, महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना काही तरूण शेजारील गुजरात राज्याच्या हद्दीतुन विनापरवानगी विमल नावाचा तंबाखूजन्य गुटखा मोठ्या प्रमाणात आणून गाव व परिसरातील किरकोळ पानटपरी धारक व इतर दुकानदांना हातोहात विक्री करणार असल्याची पक्की टिप मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलीसांची मदत घेत, सापळा रचत संध्याकाळी गावात येणाऱ्या रस्त्यावर कडेकोट लक्ष ठेवण्यात आले. ठिक आठ वाजता नंदुरबार रस्त्यावरील १३२ केव्हीजवळ शैलेश ब्रिजलाल भावसार(३४) राहणार चिरणे-कदाणे,ता.शिदंखेडा, जि.धुळे याच्याकडे सत्तेचाळीस हजाराचा (४७०००/) बेकायदेशीर विमल गुटखा वाहताना मिळून आला.तर दुसऱ्या घटनेत गावातील केशरानंद पेट्रोल पंपाजवळ शकीलखान जावेदखान मन्यार (२३) राहणार मुन्ना चौक,गढी परिसर दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे याच्याकडे बावन्न हजाराचा (५२०००/) बेकायदेशीर विमल गुटखा वाहत-व किरकोळ विक्री करतांना आढळला ,असे तक्रारीत नमुद केले आहे.
याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात दोघी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली एका गुन्ह्याचा पोलीस उपनिरीक्षक श्री देविदास पाटील व दुसऱ्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सचीन गायकवाड करत आहे. तसेच दोन्ही छाप्यात दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई योगेश पाटील, राकेशभाऊ खांडेकर, मुकेश आहिरे, संदीप कदम आदींनी मदत केली.
तसेच दोंडाईच्यात मागील अनेक महिन्यांनपासुन विमल गुटखा सर्रासपणे, बिनदिक्कत टपऱ्या-टपऱ्यावर, किराणा दुकानांवर विकला जात असे. अनेकवेळा अन्न भेसळ सुरक्षा अधिकाऱ्यांना तक्रार जरी दिली.तरी मात्र त्यांना काही तिळमात्र फरक पडत नव्हता.आता मात्र देव जाणो काय त्यांच्या अंगात आले. म्हणजे तक्रारधारक खंबीर असल्यामुळे ही कार्यवाही केली असल्याचे लोकांमध्ये बोलले जात असुन,या कार्यवाहीमुळे तंबाखू विरोधी व गुटखा मुक्ती लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.