डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये परतले
डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये परतले
वॉशिंग्टन (तेज समाचार डेस्क): नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर आता डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून घरी आहेत.
अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये ट्रम्प उपचार घेत होते. ट्रम्प अजूनही कोरोनामुक्त झालेले नाहीत. मात्र त्यांची तब्येत सुधारल्यामुळे त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये आल्याची ट्रम्प यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली. त्यांना व्हाईट हाऊसमध्येच रेमडेसीवीरचा पाचवा डोस दिला जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये.