“डॉक्टर आपुल्या दारी-संकल्प कोरोना मुक्ती”

Featured नंदुरबार
Share This:

“डॉक्टर आपुल्या दारी-संकल्प कोरोना मुक्ती”

सर्वसामान्य जनतेकडून आरोग्य विभागाचे कौतुक.

यावल ( सुरेश पाटील ) : आज दिनांक 14 मंगळवार रोजी किंनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत सर्व रोग तपासणी शिबिर घेण्यात आले त्यात मधुमेह , उच्च रक्तदाब ,मलेरिया , आणि ताप , आणि saturation, नाडीचे ठोके तपासणी करण्यात आली यामुळे किनगाव मधील सर्वसामान्य जनतेमध्ये आरोग्य विभागाचे कौतुक करण्यात आले.

विशेष म्हणजे नेहमी सरकारी दवाखान्यात बसलेले डॉक्टर आणि कर्मचारी आज रस्त्यावर चक्क टेबल, खुर्ची टाकून शिस्तीत, तपासणी करताना ग्रामस्थांना दिसून आले आणि कोरोना विषाणु बाबत लोकांच्या मनातील भय,भिती दूर करण्याचा सक्रीय प्रयत्न किनगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.मनिशा महाजन यांनी स्वतः व आपल्या आरोग्य सहकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत केला .

दिल्लीच्या मोहोल्ला क्लिनिक च्या धर्तीवर आधारित डॉक्टर आपुल्या दारी संकल्प कोरोना मुक्ती घेऊन डॉक्टर ,आरोग्य सेविका ,आरोग्य सेवक, शिपाई आणि आशावर्कर यांनी चक्क हनुमान मंदिर समोर टेबल,खुर्ची टाकून रुग्ण तपासणी केली , या बाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की खरं तर कोरोना सुरू झाल्यापासून लोकांमध्ये भय निर्माण झाले आहे , त्यामुळे लोक सरकारी रुग्णालयात येत नाही , आणि कोविड व्यतिरिक आजार असलेले रुग्ण घाबरून अंगावर सोसत आहे. आणि यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे आणि ही आमच्या साठी चिंतेची बाब झाली होती ,म्हणून डॉक्टर आपुल्या दारी-संकल्प कोरोना मुक्ती अभियान ची सुरवात प्राथमिक आरोग्य केंद्र किंनगाव तर्फे करून लोकांमध्ये जनजागृती आणि लोकांमध्ये विश्वास संपादन करण्यात आले .

आज 60 आणि इतर सर्व वयाची रुग्णाची ग्लुको मीटर ने साखर तपासली , उच्च रक्तदाब आणि थंडी ताप असलेल्या लोकांचे रक्त नमुने जागीच घेतले , आणि ज्यांना गरज होती त्यांना औषध दिली. आणि त्यातील जे high रिस्क रुग्ण आहे त्यांना उद्या xray साठी पाठवनियात येणार आहे. याचा फायदा असा झाला की आज तपासलेल्या रुग्णांपैकी नवीन मधुमेहाचे 4 रुग्ण,आणि उच्च रक्त दाबाचे 7 रुग्ण आढळून आले. आणि 24 रक्त नमुने जागी घेतल्याने थंडी ताप चे प्रमाण कमी करण्यात यशस्वी होऊ असे मला वाटते , तसेच आशावर्कर मार्फत होणारा नियमित सर्वे दररोज सुरू आहे .आणि लवकरच आता गर्भवती माता ची तपासणी सुरवात करण्यात येईल .यामुळे कोरोना संशयित रुग्ण लवकर सापडून त्यावर तात्काळ उपचार सुरू करता येतील आणि नवीन अति जोखीमच्या रुग्णचा आजारापासून बचाव होऊ शकेल आणि मृत्युदर कमी होऊ शकतो .

या कामी डॉ. मनिषा महाजन , डॉ. सागर वारके,आरोग्य सहाय्यका उषा पाटील आरोग्य सेविका के.जी इंगळे,आरोग्य सेवक जे. के सोनवणे , शिपाई सरदार कानाशा ,सर्व आशावर्कर याचे मोलाचे सहकार्य लाभले , यामुळे जिल्हा आरोग्य आधिकरी डॉ.दिलीप पोटोडे आणि तालुका आरोग्य आधिकरी डॉ.हेमंत बरहाटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.मनिषा महाजन आणि सर्व कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे ,आणि किंनगाव समस्त ग्रामस्थ,सरपंच च्या मार्फत कौतुक होत आहे आणि असे संकल्प अभियान सर्व कडे राबविले जावे अशी अपेक्षा केली जात आहे .

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *