बीज प्रक्रिया स्पर्धेत कुसूंबे येथील ज्ञानेश्वर पाटील दुसरे

Featured जळगाव
Share This:

बीज प्रक्रिया स्पर्धेत कुसूंबे येथील ज्ञानेश्वर पाटील दुसरे

गणपूर (ता चोपडा)ता   (तेज समाचार डेस्क):  सहाय्यक कृषी अधिकारी परिवार, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हानिहाय ऑनलाइन बीज प्रक्रिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर झाला असून त्यात कुसूंबे (ता चोपडा)येथील ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील दुसरे आले.
कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता, बीज प्रक्रिया मोहीम गावपातळीवर प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व मेळावे घेऊन राबवणे शक्य झाले नाही. यासाठी समाज माध्यमांचा वापर करून ही स्पर्धा राबवण्यात आली होती. स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांचे बीज प्रक्रिया करतानाचे व्हिडिओ मागवण्यात आले होते त्यात निवडक व्हिडिओ ला द फार्म बुक या यूट्यूब चैनल वर अपलोड केले असून त्याच्या अधिकाअधिक व्ह्यूज (दर्शक संख्या) आणि लाईक्स (पसंती) बीजप्रक्रिया संदर्भात केलेले माहिती पूर्वक मार्गदर्शन या वरून जिल्ह्यातून पहिल्या तीन विजेत्यांचा गुणानुक्रम 15ऑगस्ट 2021 रोजी घोषित करण्यात आला. निवड झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच कृषी विभागामार्फत पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे………..कुसूंबे(ता चोपडा)बीज प्रक्रिया करतांना ज्ञानेश्वर पाटील.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *