किनगाव येथे जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या पथकाची जुगार अड्डयावर धाड़ 5लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त- तालुक्यात अवैद्य व्यवसीकांमध्ये मोठी खळबळ

Featured जळगाव
Share This:

किनगाव येथे जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या पथकाची जुगार अड्डयावर धाड़ 5लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त- तालुक्यात अवैद्य व्यवसीकांमध्ये मोठी खळबळ

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील बराणपुर अंकलेश्वर महामार्गाला लागून असलेल्या किनगाव- इचखेडा रस्त्यावरील दगडू विश्राम पाटील यांचे शेताजवळील बखळ जागेवरील पत्री शेडमध्ये52पत्त्याचा खेळ(झन्ना-मन्ना)खेळ नेहमी सुरू असल्याबाबतची गुप्त खबर मिळाल्याने पत्त्याचा डाव सुरू असतांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत ११ जुगार खेळणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले असून,त्यांचेकडून 15हजार20 रुपये रोकड व सहा मोटरसायकली व मोबाईल असा 5 लाख42हजार520रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एकाच आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहरासह तालुक्यात टाकलेला हा दुसरा मोठा छापा आहे. जळगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कारवाई करीत असल्याने यावल तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील किनगाव – इचखेडा रस्त्यावरील दगडू विश्नाम पाटील यांचे शेताजवळील पत्री शेडमध्ये गुरुवार दि.1जुलै 2021 सायंकाळी52 पत्त्याचा खेळ सुरू असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला.या वेळी किनगाव येथील राजू तडवी नावाचे व्यक्ती हा जुगार खेळवत असल्‍याचे तक्रारीत म्हटले आहे याप्रकरणी कडू साळुंके,संजय कोळी, वासुदेव कोळी,रवींद्र पाटील, ज्ञानदेव पाटील,रफिक शहा,शेख शरीफ शेख हसन,गणेश भंगाळे विजय साळुंखे,इस्‍माईल तडवी, विलास पाटील अशा11जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर 10 ते12 इसम पोलीस पथक आल्याचे पाहून पळून जाण्यात झाले,संशयिताकडून15 हजार20 रुपयांची रोकड4लाख15हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली व मोबाईल्स असा मुद्देमाल जप्त केला आहे.कार्यवाही केलेल्या या पथकात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे वाचक तथा सपोनि एस.एच.अखेगावकर,हे.कॉ. प्रवीण पाटील,जमील अहमद खान, भूषण मांडोळे,रवींद्र पाटील,आसिफ पिंजारी,भरत डोके,यांचा समावेश आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम येथील यावल पोलिस स्टेशनला सुरू होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *