धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): शहरातील नागरिकांना जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांचा लेखी संदेश जनतेने पुढील नियम काळजीपूर्वक वाचन करून अंमलबजावणी साठी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे.
वाचा संदेश
पुढे काय ??आज 13-14 तासांचा जनता कर्फ्यू आटोपला की साेमवारपासून आपलं पुर्वाआयुष्य सुरु होईल असा अनेकांचा गैरसमज झाला आहे.
आज घरी बसलं की साेमवार पासून कुठेही फिरायला मोकळे, असंही काही जणांना वाटतंय आणि आज १२ तास सगळं बंद असल्यावर कोरोनाला रोखण्याची आपली जबाबदारी संपली असाही एक समज होतोय.
एक गोष्ट लक्षात घ्या १२ तास सगळे घरी असल्यावर, बाहेर सगळं बंद असल्यावर हे संकट टळणार नाहीये. त्यामुळे आजचे १२ तास हे पुढच्या १२ दिवसांची तालीम समजा. (तोपर्यंतही जरी आपल्याला शहाणपण आलं नाही तर पुढचे किती महिने घरात बसून काढावे लागतील माहिती नाही.)
आज तुम्ही घरात बसल्यावर आणि त्यानंतर थाळ्या, टाळ्या काहीही वाजवल्यानंतर तुम्हाला घराबाहेर पडण्याची मुभा मिळाली असं नाही..!
त्यामुळे काळजी घ्या. स्वत:ची आणि इतरांचीही…!
सजग रहा !!!!
सुरक्षित रहा !!!!
हा प्रश्न केवळ सरकारचा नाही !
हा तुमच्या आमच्या घरातील मुलं , मुली , मोठी माणसं , नातेवाईक , मित्रमंडळी या सर्वांच्या घरातील जगण्या मरण्याचा प्रश्न आहे !
त्याला काय होतंय ? मला कुठं काय झालंय? आमच्या घरात कुठं कुणाला काय झालंय ? कधी होईल तेव्हा बघु !!!
हि वृत्ती , हि मानसिकता आता नी आत्ता ताबडतोब बदलली पाहिजे !
सरकार नी त्यांचे सर्व प्रशासकीय कर्मचारी , डॉक्टर्स , हॉस्पिटल्स , समाजिक संस्था , पूर्ण शक्तीनिशी कोरोनाशी दोन हात करत आहेत ! त्यांच्या या प्रयत्नात सर्वानीच हातभार लावला पाहिजे!
सरकारचे आदेश , सूचना रोजच्या रोज , तासागणिक काळजीपूर्वक लक्षात घ्या ! व त्या आदेशाप्रमाणे वागा !
आज कर्फ्यु पाळला म्हणजे आता सुटलो …असं नाही !
हे सर्वांनी गांभीर्यानं लक्षात घेऊन , सरकारच्या आदेशाचे पालन करूया !
हे सर्व आपल्या साठी नी आपल्या घरादारासाठी , आपल्या वडील धाऱ्यांसाठी , भावी पिढीसाठी मुलाबाळांसाठीच चाललं आहे