असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन : गणेशभैया बारसे जिल्हाध्यक्ष

Featured जळगाव
Share This:

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन : गणेशभैया बारसे जिल्हाध्यक्ष

यावल (सुरेश पाटील): महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसपार्टी यांच्या मार्फत उद्या दि.16मे2021रविवार रोजी सकाळी10वाजता झूमॲप द्वारे/ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले आहे काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी,खासदार राहुल गांधी असंघटित कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद सिंग,नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,मोहम्मद बदरुजमा साहेब महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने उद्या जिल्हास्तरीय महाराष्ट्र असंघटित कामगार काँग्रेस यांची ऑनलाइन बैठक होणार आहे त्यात जिल्‍ह्यातील असंघटित कामगार रिक्षाचालक मालक,माथाडी कामगार,बांधकाम मजूर,घरकाम करणाऱ्या महिला,यांना महाविकास आघाडी सरकारने जी भरीव आर्थिक तरतूद करण्याची घोषणा केली होती ती लवकरात लवकर त्यांना मिळावी त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे,राज्यातील महाविकास आघाडी सरकारने12लाख रिक्षाचालकांना (परवानाधारक)प्रत्येकी1500रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली होती तसेच राज्यातील25लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनेसाठी तरतुदीची घोषणा या सरकारने केलेली होती तसेच बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सुद्धा 1500रुपये अनुदान देण्याची घोषणा या सरकारने केलेली होती तसेच 5 लाख फेरीवाल्यांना त्यांच्या खात्यात प्रत्येकी1500रुपये आर्थिक साहाय्य करण्याची घोषणा सुद्धा महाविकास आघाडी सरकारने केलेली होती परंतु सध्याचे कोरोनाची परिस्थिती बघता लोकडाउनमुळे मंत्रालयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती 15%असल्यामुळे प्रत्यक्ष योजना अमलात आणण्यास उशीर होत आहे परंतु लवकरात लवकर या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे जळगाव जिल्हा असंघटित कामगार काँग्रेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश भैय्या बारसे यांच्या नेतृत्वात ही मिटिंग सकाळी10वाजता ऑनलाईन पद्धतीने झुम ॲप द्वारे होणार आहे कार्यक्रमाची लिंक जिल्हाध्यक्ष यांच्याकडून घेऊन घेणे या बैठकीत कोरोना महामारीमुळे जे संकट उभे राहिले आहे त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विषयक समस्या त्या सोडवण्या विषयी चर्चा करण्यात येईल तसेच लसीकरण मोहिमेविषयी चर्चा करण्यात येणार आहे तसेच जिल्हाभरातील जे सफाई कामगार कोरोनामुळे मृत झाले आहेत शासनाने त्यांना भरपाई देण्यात यावी तसेच जिल्ह्यात ऑक्सीजन,व रेमेडिसीविर इंजेक्शन ज्याठिकाणी कमतरता आहे ती भरून काढणे व त्यासाठी उपाययोजना करणे. ऑक्सीजनची उपलब्धता कसे करता येईल व त्यासाठी निधी उभारून ऑक्सीजन सिलेंडर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही संघटना करेल या बैठकीला असंघटित कामगार काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद सिंग हे मार्गदर्शन करणार आहेत यावेळी या बैठकीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष फय्याज भाई,
प्रसन्न गुणवंतराव देशमुख जिल्हा समन्वयक व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सोशल मीडिया आय.टी.सेल,व जावेद भाई,असलीरोस,श्रीमती योगिता शुक्ला,सौ.प्रेरणा युवराज भंगाळे, अतुल धंजे,अजय भाऊ बढे यावल तालुका अध्यक्ष तसेच ऍड.आर.टी. पटेल,आकाश चिटोले,शिवा कलोसे अमररील रावेर तालुका,अध्यक्ष प्रदीप आदिवाल,प्रदीप मेढे रावेर तालुका महासचिव,मदिना तडवी,अरिफा तडवी,छाया कोरडे,भारतीताई नकवाल,जयेश फालक,दिवाकर फेगडे,जगदीश धांडे,उल्हास नेमाडे, तसेच सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष व सचिव या बैठकीत उपस्थित राहतील.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *