नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छाग्रहींना सॅनिटाईझर, मास्कचे वाटप

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) –  कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रहीच्या सुरक्षिततेसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲङ. सिमा पद्माकर वळवी यांचे हस्ते सॅनिटाईझर, मास्क व हॅन्डग्लोज यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतनदादा पाडवी, बांधकाम सभापती अभिजित पाटील उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख व जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविले जात आहेत.कोरोना विरुद्धच्या या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ ,पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुका कक्षातील कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताग्रही सक्रिय झालेले असून त्यांचेमार्फत ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्तरावर कोरोनाबाबत जाणीव जागृती केली जात आहे.

ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रहींची सुरक्षितता व त्यांचे आरोग्य जपणे यासाठी राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दि.20 एप्रिल 2020 च्या शासननिर्णयादवारे ग्रामपंचायत स्तरावर कोरोना आजाराच्या प्रतिबंधसाठी काम करणाऱ्या स्वच्छाग्रहींना जागतिेक बँक प्रोत्साहन अनुदान अंतर्गत हँन्डग्लोज, सॅनिटाईझर तसेच मास्क आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणेबाबत सूचित केले होते.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कोरेानाचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायती व शहराजवळील असलेल्या ग्रामपंचायतीतील एकूण 310 स्वच्छाग्रही यांचेसाठी हँन्डग्लोज, सॅनिटाईझर तसेच मास्क वाटप करण्यात येणार आहे.

त्यानुसार दि.22 रोजी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲङ. सिमा पद्माकर वळवी यांचे हस्ते नंदुरबार तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीतील स्वच्छाग्रहींना सॅनिटाईझर, मास्क व हॅंन्डग्लोज यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा समाज कल्याण सभापती रतनदादा पाडवी, बांधकाम सभापती अभिजित पाटील, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) भुपेंद्र बेडसे, , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) डॉ.वर्षा फडोळ आदी उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *