यावल येथे रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप 

Featured जळगाव
Share This:
यावल( प्रतिनिधी) –  अर्सनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधास आयुष मंत्रालय भारत सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांचे तर्फे त्यांच्या प्रभागाच्या नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात येत असून  कुटुंबातील प्रत्येक सदस्याला किमान तीन दिवस पुरतील या पद्धतीने या गोळ्यांचे वितरण घरोघरी जाऊन केले जात आहे.
नगरसेवक अतुल पाटील यांनी स्वखर्चाने स्वयंसेवक व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने करत आहे. संपूर्ण प्रभागात १००० बॉटल चे वाटप करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने वाटप सुरू करण्यात आले आहे यामध्ये फालक नगर, गंगानगर, तिरुपती नगर, गणपती नगर, कृष्ण तारानगर, पांडुरंग सराफ नगर, भास्कर नगर, गुरुदत्त नगर, व्यास नगर, विरार नगर, गणेश नगर, तडवी कॉलनी, रजा नगर, पूर्णवाद नगर व हरिओम नगर व इतर विस्तारित भागामध्ये करण्यात येणार आहे.
 प्रभाग हा आपला परिवार असून काळजी घेणे हे आमचे कर्तव्य व जबाबदारी आहे असे अतुल पाटील यांनी सांगितले . दरम्यान ज्या नागरिकांना अद्याप गोळ्या मिळालेल्या नसतील त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *