भुसावळात रेल्‍वेच्‍या खासगी कामगारांना जिवनावश्‍यक वस्‍तु वाटप

Featured जळगाव
Share This:

 भुसावळ (तेज समाचार डेस्क):  येथे रेल्‍वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्‍य प्रबंधक आर.के.शर्मा यांच्‍या मार्गदर्शनाखाली इंडियन रेल्वे टिकट चेकिंग स्टाफ ऑर्गनाइजेशन भुसावळ मंडळ  यांनी आपले सामाजिक कार्य निरंतर सुरु ठेवत ५० हजार रु पंतप्रधान मदतनिधीसह एकुण दिड लाख रू. रेल्वेशी संबंधित कुली,स्‍वच्‍छता कामगार,विश्रामगृहात कार्यरत कामगार व काही खासगी कर्मचार्‍यांना संकटकाळात मदत गरजेची असल्‍याने त्‍यांना जिवनावश्‍यक वस्‍तुंचे वाटप करण्‍यास सुरुवात करण्‍यात आली.या मदतीच्‍या पहिल्‍या फेरीत २५० जणांना मदत करण्‍यात येईल.सर्वप्रथम ५० कुलींना हे किट देण्‍यात आले.यात  ५ किलो आटा,३ किलो तांदुळ,१ किलो तुरदाळ,१किलो रिफाएंड तेल,१ किलो पोहा,१ किलो साखर,हळद,धणे व मिर्ची पावडर ,१ किलो मीठ पावडरचा समावेश आहे.सोबतच रस्त्यावरुन ये-जा करणा-या श्रमिकांना बिस्किट आणि इतर खाद्यपदार्थ वाटप करण्‍यात येणार आहे.या मोहीमेत सहाय्‍यक वाणिज्‍य प्रबंधक श्री. पाठक,डिसीटीआय श्री. आलुवालिया,वाय.डी.पाठक,ए. पी.धांडे,निसार अहमद, व्ही.के. सचान,ए.एस.राजपूत,डी.एम.कापगते,एस.व्‍ही.खरात व सर्व तिकीट तपासणीस विभागाने परिश्रम घेतले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *