
शेंदुर्णीत कोरोना युद्धांना आयुर्वेदिक औषधी व मासचे वितरण
शेंदुर्णीत कोरोना युद्धांना आयुर्वेदिक औषधी व मासचे वितरण
जामनेर (तेज समाचार प्रतिनिधि) : शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी येथील भोई गल्लीतील ममता रुग्णालय येथे कोरुना लढाईत अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर पत्रकार व पोलीस बांधवांना आयुर्वेदिक औषधी व मासचे वितरण करण्यात आले सदर आयुर्वेदिक औषधी प्रतिकारक्षमता मजबूत करण्याकामी उपयोगी पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले
त्याचप्रमाणे त्यावेळी लहान बालकांना सुवर्ण प्राश औषधाचे ड्रॉप या उपक्रमाचा शुभारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला कोरोना योद्धा ना औषधे व मास चे वितरणाचा शुभारंभ पाचोरा पीपल्स बँक चे माजी व्हाईस चेअरमन राजमल अग्रवाल यांनी केला
सर्वसामान्य नागरिकांना प्रतिकारक्षमता वाढवणारी आयुर्वेदिक औषधी काढा ना नफा या तोटा या तत्वावर यापुढेही वितरीत करणार असल्याचे यावेळी डॉक्टर चेतन अग्रवाल यांनी सांगितले यावेळी राजमहल अग्रवाल गोविंद अग्रवाल डॉ देवानंद कुलकर्णी नरेंद्र इंगळे निलेश थोरात विनोद अग्रवाल राहुल अग्रवाल आधी उपस्थित होते
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ चेतन अग्रवाल डॉ मयुरी अग्रवाल डॉ पूजा अग्रवाल सोमनाथ शिंपीभावना पाटील आदींनी परिश्रम केले
फोटो कॅप्शन पत्रकार व पोलीस बांधवांना मास्क व सिद्ध जल पावडर चे वितरण करताना गोविंद अग्रवाल राजमल अग्रवाल डॉ चेतन अग्रवाल व इतर