
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशाचे अर्ज वाटप
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशाचे अर्ज वाटप
यावल (सुरेश पाटील): यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2021 22 शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांचे नाव सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. दारिद्र रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक नमुद असलेला ग्रामसेवकाचा दाखला पालकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख या मर्यादेत असावे इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 30 सप्टेंबर 2019 रोजी सहा वर्ष पूर्ण असावे त्याचा जन्म एक ऑक्टोंबर 2014 ते 30 सप्टेंबर 2015 दरम्यान झालेला असावा.
इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी सदर विद्यार्थी सन 2020 21 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडावे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे, तसेच विद्यार्थ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्र विद्यार्थ्यांचे पालक शासकीय निम शासकीय नोकरदार नसावेत तरी या योजनेअंतर्गत या पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्म दाखला व आधार कार्ड साक्षांकित प्रत सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामूल्य दिनांक 5/2/ 2021ते 5/3/2021 या कालावधीत वाटप केले जाणार आहे व सदरील परिपूर्ण अर्ज भरून दिनांक 10 मार्च 2021 पूर्वी अर्ज सादर करावा.
इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी च्या प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणीसाठी चोपडा,अमळनेर, एरंडोल,धरणगाव,जळगाव तालुक्यामधील पालकांनी व पाल्यांनी दिनांक 15/3/2021रोजी बालमोहन विद्यालय चोपडा शिव कॉलनी चोपडा, शिरपुर रोड, चोपडा येथे उपस्थित रहावे.
इयत्ता पहिली इयत्ता दुसरी च्या प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणीसाठी रावेर यावल, मुक्ताईनगर,जामनेर,बोदवड,भुसावल, चाळीसगाव,पाचोरा,भडगाव तालुक्यामधील पालकांनी व पाल्यांनी दिनांक 15/3/2021 रोजी शासकीय आश्रम शाळा डोंगर कठोरा तालुका यावल येथे उपस्थित राहावे असे जाहीर आव्हान प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांनी केले आहे.