आईच्या पुण्यस्मरणानिमित्त गोर गरीब,गरजू लहान मुलामुलींना खाऊ वाटप आणि मंदिरात रोख स्वरूपात देणगी दिली

Featured जळगाव
Share This:

आईच्या पुण्यस्मरणानिमित्त गोर गरीब,गरजू लहान मुलामुलींना खाऊ वाटप आणि मंदिरात रोख स्वरूपात देणगी दिली.

सर्वसामान्य कुटुंबातील विवाहित तरुण एलआयसी एजंटची कौतुकास्पद समाजसेवा.

यावल (सुरेश पाटील): तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी याची जाण ठेवत यावल येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील एलआयसी एजंट यांनी आपल्या आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त यावर्षी सुद्धा गोरगरीब मुला-मुलींना खाऊ वाटप आणि धार्मिक मंदिरात रोख स्वरूपात देणगी दिली या खऱ्या समाजसेवेची संपूर्ण यावल शहरात कौतुकास्पद चर्चा असून प्रत्येकाने आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि वाढदिवसानिमित्त आपापल्या कुवतीनुसार समाजसेवा केली तर खऱ्या अर्थाने प्रापंचिक परमार्थ साधला जाईल असे सुद्धा बोलले जात आहे.
एलआयसी एजंट मुकेश घोडके यांनी दि.25मे2021मंगळवार रोजी सकाळी आपल्या आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्त यावल येथील गोळीबार टेकडी,फैजपुर रोडवरील मनुदेवी मंदिर समोर लहान मुले-मुली मोठ्या स्त्री-पुरुषांना शेवचिवड़ा, बिस्किट,पेढे,चॉकलेट आपल्या लहान मुला-मुलींच्या आणि कुटुंबियांच्या तसेच मित्र मंडळीच्या हस्ते वाटप केले यात कोणतीही प्रसिद्धी डोळ्या समोर न ठेवता किंवा कोणत्याही प्रकारच्या मान्यवरांना,राजकीय, पदाधिकारी,कार्यकर्ते यांना आमंत्रित न करता गोरगरीब आणि खऱ्या गरजू मुला-मुलींना स्त्री-पुरुषांना खाऊवाटप करण्यात आला यावेळी स्वतःमुकेश घोड़के,चरण घोड़के,जितेंद्र घोड़के,अजय बाविस्कर,सागर सपकाले,तुषार येवले उपस्थित होते. तसेच यावल येथील साईबाबा मंदीरास व स्वामी समर्थ केंद्रात प्रत्येकी11हजार रुपये रोख स्वरूपात देणगी दिली,व सुरत येथील महादेव मंदीरास5हजार रुपये देणगी दिली,आपण नेहमी समाजाचे काही तरी देणे लागतो या शुद्ध भावनेतून आणि हेतूने जे आपल्याने शक्य होईल ते करत राहावे असे प्रत्यक्ष मुकेश घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *