यावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घनकचरा ठेकेदाराच्या घोळाची चर्चा.

जिल्ह्यात एका मक्तेदाराने काही स्थानिक नगरसेवकांना केले घनकचरा वाहतूक मजूर…

यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली.असे वृत्त ऑनलाईन प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नगरपालिका कार्य क्षेत्रांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.कारण जळगाव जिल्ह्यात अनेक नगरपालिका कार्यक्षेत्रातील घनकचरा संकलन करून वाहतूक करण्याचे कोट्यवधी रुपयाचे ठेके एकाच मक्तेदाराने घेतले असल्याचे भ्रमणध्वनीवरून अनेकांनी सांगितले तसेच हे घनकचरा संकलन करून वाहतुकीचे ठेके त्या मक्तेदाराने स्थानिक काही नगरसेवकांना हाताशी धरून चक्क घनकचरा वाहतूक मजूर बनवून त्यांना टक्केवारीची मजुरी देण्याचे निश्चित केले असल्याचे बोलले जात असल्याने जिल्हाधिकारी जळगाव यांनी जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकामधील घनकचरा संकलन व वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांचे कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता जिल्ह्यातील अनेक नगरपालिकाचा घनकचऱ्यातील घोळ गैरप्रकार,भ्रष्टाचार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात नगरपालिकातर्फे घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत शहरातील गाळ,कचरा,डेब्रिज वाहतूक व द्वार ते द्वार कचरा संकलन,ओला व सुका कचरा वर्गीकरण करून संकलन करणे व त्याची वाहतूक नगरपरिषदेच्या कंपोस्ट खत प्रकल्पावर करणेच्या कामाचे ठेके जे देण्यात आलेले आहेत त्यापैकी 50% नगरपालिकाचे ठेके जिल्ह्यातील एकाच मक्तेदाराने घेतले आहे या मक्तेदाराकडे घनकचरा वाहतुकीसंदर्भात अटी शर्तीनुसार सर्व यंत्रणा आणि मजूर कार्यरत आहे का?असा प्रश्न उपस्थित केला जात असून त्या ठेकेदाराने काही नगरपालिकेतील स्थानिक नगरसेवकांना आणि काही नगरसेविकांच्या(झेरॉक्स) पतींना हाताशी धरून किंवा स्थानिक नगरसेवकांच्या प्रभावाखाली ठेकेदाराने या सर्वांना घनकचरा वाहतुकीसंदर्भात आर्थिक कमाईसाठी मजूर करुन टक्केवारीची रक्कम/मजुरी देऊन त्यांच्याकडून घनकचरा वाहतुकीचे काम त्यांच्या सोयीनुसार केले जात असल्याचे बोलले जात आहे यात एका नगरपालिकेतुन दर महिन्याला3 ते5/6 लाख रुपयाचे बिले मूळ ठेकेदाराच्या नावाने काढून घनकचरा वाहतुकीतील उप ठेकेदार मजूर व काही झेरॉक्स नगरसेवक आपापसात रकमेचे विल्हेवाट लावून घेत आहे.
घनकचरा संकलन आणि वाहतूक करताना दररोज किती टन घनकचरा संकलन केला जातो ओला व सुका कचरा चे वर्गीकरण कसे केले जाते त्यापासून कंपोस्ट खत किती टन तयार झाले याबाबत अनेक प्रश्न जळगाव जिल्ह्यात उपस्थित केले जात असल्याने जळगाव जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील घनकचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यास जिल्ह्यात घनकचरा वाहतुकीत किती मोठा घोळ गैरप्रकार भ्रष्टाचार झाला आहे हे उघडकीस आल्या शिवाय राहणार नाहीअसे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *