
कोल्हापुरातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार
कोल्हापुरातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार
कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): कोकण किनारपट्टीवर आलेला मान्सून येत्या दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान काल रविवार पासून जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने धडाका लावला आहे. आत्ता पडलेला पाऊस आणि मान्सून सलगपणे सुरू राहिल्यास पहिल्याच टप्प्यात पुराचा धोका आहे. अद्याप कोल्हापुरातील सर्वच प्रमुख धरणात 75 टक्के पाणीसाठा आहे. पाणी पातळी राखण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
राधानगरी धरणात आज अखेर 42.84 दलघमी पाणीसाठा आहे. तुळशी 46.66 दलघमी, वारणा 327.25 दलघमी, दूधगंगा 214.39 दलघमी, कासारी 21.38 दलघमी, कडवी 30.20 दलघमी, कुंभी 27.14 दलघमी, पाटगाव 22.71 दलघमी, चिकोत्रा15.42 दलघमी, चित्री 13.05 दलघमी, जंगमहट्टी 9.29 दलघमी, घटप्रभा 14.91 दलघमी, जांबरे 6.31 दलघमी, कोदे (ल पा) 1.38 दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम10.6 फूट, सुर्वे 9 फूट, रुई 37.3 फूट, हेरवाड 31 फूट, शिरोळ 24.6 फूट, नृसिंहवाडी 18 फूट, राजापूर 11.6 फूट तर नजीकच्या सांगली 5 फूट अशी आहे.