बदल्यांवरून मतभेद, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रात जाणार ,

Featured महाराष्ट्र
Share This:

 

 मुंबई (तेज समाचार डेस्क):  पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे नाराज पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल (Subodh Jaiswal) केंद्रीय सेवेत जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती, ती विनंती मान्य करण्यात आली आहे.

पोलिसांमधील होणाऱ्या बदल्या जैस्वाल यांना पटत नव्हत्या. या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करू नका, असंही जैस्वाल यांना राज्य सरकारकडून सुनावलं गेले होते. नक्षलग्रस्त भागातील नियुक्ती सक्तीची हवी, असंही जैस्वाल यांचं म्हणणं होतं. २२ आयपीएस अधिकारी नक्षलग्रस्त भागात गेलेच नाहीत, असंही जैस्वाल यांनी सांगितलं होतं.

सुबोध जैस्वाल हे केंद्र सरकारच्या सेवेत होते, त्यानंतर ते मुंबईत आले. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. सरकार आणि सुबोध जैस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या बदल्या मी होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. राज्य सरकारबरोबर पटत नसल्यानं पुन्हा एकदा त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तशी त्यांनी ठाकरे सरकारला विनंती केली होती. सुबोध जैस्वाल हे केंद्रात गेल्यानंतर राज्यात पोलीस महासंचालकपद रिक्त होणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *