
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या लहान भावाचं कोरोनामुळे निधन
मुंबई (तेज समाचार प्रतिनिधि)| अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. असलम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने मुंबई मध्ये वांद्रे परिसरातील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मागील काही दिवसांपासून असलम खान यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारा दरम्यान त्यांचं आज सकाळी निधन झालं आहे. अस्लम खान यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधीत काही समस्यादेखील होत्या, असं सांगण्यात येत आहे. दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू एहसान खानदेखील कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण त्यांची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सायरा बानू आणि दिलीप कुमार घरीच असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.