डिझेल पेट्रोलपेक्षा महाग- आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ!
डिझेल पेट्रोलपेक्षा महाग- आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ!
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एका अजब रेकॉर्डची नोंद झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झालं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त आहे.
गुरुवारी राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत प्रतिलिटर ८०.०४ रुपये लिटर आहे, तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७९.९२ रुपये लिटर आहे. इतिहासात डिझेलची ही सर्वोच्च किंमत आहे.
दुसरीकडे गेल्या १५ दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती जशाच्या तशा आहेत. त्या प्रतिबॅरल ३५ ते ४० डॉलरच्या दरम्यान आहेत, मात्र देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
जानकारांच्या मते, तेल कंपन्यांनी मागच्या १९ दिवसात दिवसात पेट्रोलची ८.६४ किंमत इतक्या रुपयांनी वाढवली आहे तर डिझेलच्या किमतीत रेकॉर्डब्रेक १०.४१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.