
फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!
अर्जेंटिना (तेज समाचार डेस्क). जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं निधन झालंय. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. फुटबॉलचा जादूगार हरपल्याने फुटबॉल चाहत्यांवर शोककळा पसरलीये.
1986 साली आपल्या खेळीने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅराडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. ‘हँड ऑफ गॉड’ अशी मॅराडोना यांची ओळख होती. मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅराडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता.
अर्जेंटिनाच्या संघाकडून त्यांनी 91 सामन्यांमध्ये तब्बल 34 गोल करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं होतं. अखंड फुटबॉल कारकिर्दीमध्ये त्यांनी 259 गोल केलेत.