बँकेचा सायरन अचानकपणे जोरात वाजल्याने परिसरात खळबळ उडाली !

धुळे
Share This:

बँकेचा सायरन अचानकपणे जोरात वाजल्याने परिसरात खळबळ उडाली !

धुळे (विजय डोंगरे) : शहरातील जमनालाल बजाज रोडवरील विजया बँक शाखेच्या बाहेरील सायरन अचानक पणे साडेनऊच्या दरम्यान जोरदारपणे वाजू लागल्याने परिसरात एकदम खळबळ उडाली. जोराने वाजत असलेल्या सायरनचा आवाज दूरपर्यंत गेल्याने नागरिकांना तो ऐकायला आल्याने आवाजाच्या दिशेने काही नागरीक धावत आले बँके समोरील रस्त्यावर गर्दी जमा झाली. बँकेच्या आत कोणी शिरले आहे का असा प्रश्‍न नागरिकांना पडला. सायरन वाजत असताना रस्ताहुन जाणाऱ्यांची व येणाऱ्या ची नजर बँकेच्या दिशेनेच जाऊन वाजणारा सायरन पाहून काही जण क्षण भर थांबत विचारणा करत तर काही जण पाहून निघून जात सगळा प्रकार पाच दहा मिनिटे सतत सुरू होता. एका नागरिकाने हाकेच्या अंतरावर असलेल्या शहर पोलीस चौकीत निरोप दिला बँकेजवळील सायरन वाजतोय.निरोप मिळताच पोलिस दादा तातडीने घटनास्थळी दाखल झाले.परंतु ते तिथे येऊन काही करू शकत नव्हते कारण फोन कोणाला करणार असा प्रश्न पोलिसदादा समोर उभा ठाकला. बँकेच्या बाहेरील जागेवर कुठे जाहिराती फलकावर व कुठेच संपर्क नंबरच नाही.यानंतर परिसरातील एक-दोन नागरिक तिथे आले ते म्हणाले की हा असा प्रकार रात्री-बेरात्री केव्हाही सूरु होतो. व तासंतास आवाज सुरूच राहतो. आमची झोपमोड होते. यानंतर पोलीस दादानी बँकेचे शटरला एक धक्का लागवला या नंतर दहा मिनिटानंतर बँकेचा सायरन बंद झाला.

सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.सायरन आवाज बंद झाल्याचे पाहून सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला.तेथून सगळेच जण निघून गेले.

परंतु यातून एक बाब समोर आली की बँकेचे अधिकारी कर्मचारी हे सुद्धा बेफिकीर असतात त्यांच्याशी संपर्क करायला फलकावर कोणाचाही नंबर नसतात यामुळे काहीच करता येत नाही. एखाद्या दिवशी कुठली अपरिहार्य घटना घडू नये आणि ‘लांडगा आला रे आला’ अशी बाब होऊ नये.हिच माफक इच्छा परिसरातील नागरिक संतोष शर्मा यांनी या वेळी बोलून दाखवली.व सगळ्यांनीच सुटकेचा श्वास घेतला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *