Dhule Muncipality

धुळे: मनपा वतीने शहरात तीन भागात दोन दिवस लॉक डाऊन

Featured धुळे
Share This:
धुळे  (तेज समाचार प्रतिनिधि ): मनपा वतीने शहरात तीन भागात दोन दिवस लॉक डाऊन.धुळे महानगर पालिके मार्फत शहरात प्रायोगिक तत्त्वावर रंगीत तालीम म्हणून शहरातील जुने धुळे परिसर मच्छीबाजार मौलवी गंज परिसर अकबर चौक माधवपुरा तिरंगा चौक अमर नगर पारोळा रोड हे प्रभाग क्रमांक 8 9 व 10 दिनांक 15 व 16 एप्रिल या दोन दिवसांसाठी  संपूर्णता 100% 12 करण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही या भागातील दुकाने दोन दिवस पूर्णपणे बंद राहतील तथापि या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू ची आवश्यकता असल्यास त्या वस्तूंचा पुरवठा अन्नधान्य भाजीपाला दूध औषधे संबंधित दुकानदारांकडून बाजारभावाप्रमाणे घरपोच होणार आहेत यासाठी संबंधित पुरवठा पुरवठा दुकानदारांचे संपर्क क्रमांक भागात पत्रकाद्वारे वितरित करण्यात आलेले आहे तसेच रिक्षा द्वारे जाहीर आव्हान सदर भागात करण्यात आलेले आहे नागरिकांनी संबंधित पुरवठादार यांच्याशी संपर्क क्रमांकावर संपर्क करून जीवनावश्यक वस्तू गरज असल्यास प्राप्त करून घ्याव्यात या  वितरण प्रणालीत काही अडचणी असल्यास त्यासाठी धुळे महानगरपालिका अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक प्रत्येक विभागात तैनात केलेले आहे त्यांच्याशी संपर्क क्रमांक संबंधित भागात पत्रकाद्वारे
वितरित करण्यात आलेले आहे
संपूर्ण प्रभागात शिरकाव होणाऱ्या ठिकाणी येथील करून रस्ते अडवण्यात आलेले आहे याच बरोबर सदर भागात थर्मल मिटर यंत्राद्वारे प्रत्येक कुटुंबात मनपाच्या वैद्यकीय पथकामार्फत थर्मल स्कॅनिंग तपासणी करण्यात येणार आहे व संपूर्ण भागात स्प्रिंग मशीन द्वारे रसायन फवारणी ही करण्यात येणार आहे
   सदर पायलेट प्रोजेक्ट हा संपूर्ण भारतातील असा पहिलाच प्रयोग असून हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी व नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आज रोजी सायंकाळी पाच वाजता मनपा सभागृहात माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप जगदाळे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित महापौर श्री चंद्रकांत सोनार आयुक्त अजीज शेख जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  वांमती मॅडम अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्री भुजबळ साहेब डीवायएसपी सचिन हिरे व अन्य अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती आज दिनांक 14 रोजी सदर भागात करावयाच्या उपाययोजना विषयी संपूर्ण चर्चा करून रूपरेषा निश्चित करण्यात आलेली आहे
बैठकीत विविध मुद्यांवर व उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली यात प्रामुख्याने मालेगाव शहराकडून येणारे सर्व प्रमुख रस्ते व अन्य छोटे  चोर रस्ते पूर्णपणे बंद करणे.. मालेगाव येथील कोणी व्यक्ती शहरात आल्यास त्याबाबत तातडीने माहिती देणे त्यासाठी भागातील स्वयंसेवकांची मदत घेणे . भविष्यात संपूर्ण शहर लोक डॉन करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासंदर्भात यंत्रणा निर्माण करणे.. शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करणे.. वैद्यकीय सेवेचे कारण दाखवून व फाईल दाखवून दिशाभूल करणाऱ्या नागरिकांवर क** कारवाई करणे.. प्रत्येक प्रभागासाठी स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांचे दोन पथक निर्माण करणे इत्यादीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आलेला आहे
दिनांक 15 व 16 रोजी करण्यात येणाऱ्या लॉक डाऊन परिसराची पाहणी महापौर चंद्रकांत सोनार व संबंधित पोलीस निरीक्षक यांनी केली
 या बैठकीस स्थायी समिती सभापती श्री सुनील बैसाणे विरोधी पक्षनेते साबिर शेठ महिला बालकल्याण सभापती स्नेहल जाधव उपायुक्त श्री गणेश गिरी सहाय्यक आयुक्त श्री शांताराम गोसावी विनायक कोते तुषार नेरकर आरोग्याधिकारी डॉक्टर महेश मोरे तसेच संबंधित भागातील पोलीस निरीक्षक अधिकारी स्वच्छता निरीक्षक कनिष्ठ अभियंता इत्यादी उपस्थित होते
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *