
धुळे: तिरंगा चौकातील नजीम नगरातील पत्रटी घरातून लाखोंची रोकड सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले
धुळे: तिरंगा चौकातील नजीम नगरातील पत्रटी घरातून लाखोंची रोकड सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच. मध्यरात्री व्यवसायिकाच्या घरातून लाखोंची रोकड व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील ऐंशी फुटी रस्त्यावरील तिरंगा चौकातील नजीम नगरात रडणारे अजिज शेख (बेकरी वाले)यांचे पत्रटी घर असून कालरात्री घरात लहान मुले झोपली होती मुलीची तब्येत बरी नसल्याने तिचे उपचारासाठी घराला बाहेरून कुलूप लाव सगळे जण रुग्णालयात गेले होते यादरम्यान त्यांचे घरात अज्ञात चोरट्यांनी घराचे दाराचा बाहेरील कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट फोडून कपाटातील चोर कप्प्यात ठेवलेले दीड लाख रुपये रोख व सोन्याचे मणी मंगळसूत्र असा एकूण 1 लाख 77 हजार रुपयांचा मला चोरट्यांनी लंपास केला. मुलीचे उपचारार्थ हे कुटुंबीय रुग्णालयात गेले होते लहान मुले घरात झोपली होती परंतु चोरट्यांनी अगदी सावधपणे आवाज न करता लाखोंचा ऐवज दागिने लंपास केले सकाळी आजीज शेख घरी परतले तेव्हा घराचे दाराचे कडी कोंडा तोडल्याचे लक्षात आले घरात डोकावून पाहिले असता कपाटातील साहित्य जमिनीवर फेकले होते. चोरी झाल्याचे शेख यांचे लक्षात आले. त्यांनी चोरीबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात माहिती दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अधिक तपास कामी व मदतीसाठी फिंगरप्रिंट तज्ञांची मदत घेण्यात आली.
फिंगरप्रिंट तज्ञ अधिकाऱ्यांनी लोखंडी पत्रटी कपाटावर काही ठसे उमटले आहेत का याची पाहणी केली.
याबाबत मेहरूनिस्सा शेख यांनी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून दीड लाख रोख रक्कम व सोन्याचे मणी मंगळसूत्र त्यांची किंमत अंदाजे सत्तावीस हजार असा एकूण एक लाख 77 हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला. प्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. त्यानुसार चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.