धुळे : रिक्षातून येऊन चोरट्याने घरातील हजारो रुपयांचे साहित्य लुटले

धुळे
Share This:
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळ्यात चोर सुद्धा चोरी करताना नव नवीन कुल्पत्या शोधून चोरी करून पसार होत आहे.असाच एक प्रकार कॉलनी परिसरात घडला.नागरीक हि या प्रकारामुळे अचंबित झाले.
याबाबत माहिती की चाळीसगाव रोड परिसरातील राजवाडे कॉलनीतील रघुनाथ माळी यांचे राहते घर पत्नीच्या उपचारासाठी दुपारच्या वेळी घराला कुलूप लावून ते दवाखान्यात गेले होते.याच दरम्यान बंद घराचा फायदा घेत चोरटा रिक्षातून आला त्यांने रिक्षा दाराच्या समोर रस्त्यावर उभी केली व भिंतीवरून चोरटा आत शिरला त्याने कंपाऊंडमध्ये ठेवलेली  एक मोठी परात, एक भरलेले सिलेंडर व काही रोख रक्कम असा अंदाजे एकूण साडेतीन ते चार हजार रुपयांचे साहित्य रिक्षा टाकून गेटचे कुलूप तोडून चोरटा पसार झाला होता.
माळी यांच्या घरासमोर रिक्षा उभी असल्याने समोर असलेल्या नागरिकांनी रिक्षा पाहिली परंतु त्यांना असे वाटले की त्यांच्याकडे बाहेर गावाहून नातेवाईक आले असतील त्यांनी त्याकडे बाबीकडे लक्ष दिले नाही.माळी हे दवाखान्यातून सायंकाळी घरी परत आल्यावर त्यांना लोखंडी गेटचे कुलूप तोडलेले दिसले.माळी यांचे लक्षात आले की घरात चोरी झाली आहे. त्याने आजूबाजूला विचारले की तुम्ही कोणाला बघितले का.समोरील घरात राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले की तुमच्या घरासमोर बराच वेळ एक रिक्षा उभी होती.चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला घरात चोरी झाल्याची माहिती दिली व घरातून चोरी झालेल्या साहित्यांची  लेखी तक्रार नोंद केलेली आहे.
पुढील तपास चाळीसगाव पोलिस करीत आहे
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *