धुळे: रामवाडी चौकातील मयूर मेडिकल फोडून चोरट्यांनी हजारोंची रोकड लंपास केली

Featured धुळे महाराष्ट्र
Share This:
धुळे( विजय डोंगरे ): धुळे शहर हद्दीत परत एकदा चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे आज पार्टीच्यावेळी जुना आग्रा रोड वर मालेगाव रोड रामवाडी चौकातील मयूर मेडिकल फोडून चोरट्यांनी हजाराची रोकड लंपास केली. मिळालेल्या माहितीनुसार दुकान मालकाने शुक्रवारी सायंकाळी साडेनऊ वाजता नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी निघून गेले.त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान दुकानाचे शटर स्क्रु ड्रायव्हरने तोडून दुकानात आत प्रवेश करून गल्यातील 7 हजारांची रोख रक्कम, व 4 हजार रुपयांचा मॉनिटर ,असा एकूण 11 हजार रूपयांचा माल
चोरट्यांनी चोरुन नेला. राम वाडीतील मोकळ्या जागेत चोरट्यांनी मोटरसायकल पार केली होती जाताना तिथेच जमिनीवर व दुकानात दोन नवीन स्कूल ड्रायव्हर फेकून गेले होते सकाळी पाचच्या दरम्यान चहा वाले दुकान सुरू करण्यासाठी आले असता त्यांनी मेडिकल दुकानाचे शटर अर्धवट उघडे असलेले दिसले त्यांनी दुकान मालक तिर्थ कुमार शीतल कुमार जैन यांना सॉरी बाबत माहिती दिली तिर्थ कुमार जैन हे तातडीने मेडिकल दुकानाजवळ आले त्यांनी शहर पोलिसांना दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दुकानात चोरी झालेल्या जागेची पाहणी केली मदतीसाठी श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांची मदत घेण्यात आली यावेळी श्वान रामवाडी चौकातच घुटमळत राहिला.
दुपारी उशिरापर्यंत मेडिकल दुकानात चोरीबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते याअगोदरही शहर हद्दीतील चार मेडिकल दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले होते.व हजारोंची रोकड लंपास केली होती. मयूर मेडिकल मध्येही काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे चोरट्यांनी चोरी केली होती व आठ दिवसापूर्वी दुकान मालक प्रीती जैन या दुकानात असताना त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका करणे फोन करून त्या दुकानात माल विक्री करत असताना एका अज्ञात हॅकर चोरने त्यांचेकडून बँकेतील अकाउंट नंबर व एटीएम कार्ड नंबर पासवर्ड विचारून दीड लाखांचा गंडा घातला होता. चोरीप्रकरणी शहर पोलिसांनी एक पथक तयार करून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *