
धुळे : राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथकाची कारवाई लाखो रुपयांची दारू कार व 2 जण ताब्यात
धुळे : राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथकाची कारवाई लाखो रुपयांची दारू कार व 2 जण ताब्यात
धुळे (तेजसमचार प्रतिनिधि):धुळे जिल्हा दारु पिणारा जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यातून दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून बऱ्याचदा अवैधरित्या देशी-विदेशी मद्यसाठा वाहतूक होत असते व आशा वाहतूक होणाऱ्या मध्ये साठा वरती भरारी पथकाची कारवाई होत असते त्याचप्रमाणे आज बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली आहे. याबाबत माहिती की आयुक्त सो रा.ऊ.शु म.रा.मुंबई, .उमाप, संचालक मॅडम सो उषा वर्मा रा.ऊ.शुम.रा.मुंबई , विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ साहेब नाशिक विभाग, नाशिक तसेच थी.संजय पाटील,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,धुळे यांचे मार्गदर्शनाखाली धुळे जिल्यातील भरारी पथकाने हॉटिल शुभम साक्री रोड, नेर, येथे वाहन क्रमांक MH-12 FC- 4386 च्या वाहनाची तपासणी केली असता वाहनात देशी,विदेशी मद्य बियरचे खोके मिळून आले.जप्त केलेल्या गाडीसह व पुढील वर्णनाचा रुपये ३,४३,०४०/- चा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देयमाल
जत्प करण्यात आला तसेच सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे नामे १) संदीप प्रल्हाद चव्हाण ,वय वर्ष २९, रा.झेंडा चौक, जय बजरंग कॉलोनी,नगाववारी, देवपूर,धुळे,२) राहुल सुनेश चौधरी, वय वर्ष २४,रा.मारुती मंदिरा जवळ, चौधरी वाडा, चाळीसगाव,जि. जळगाव असे असून सदर गुन्ह्यात जप्त मुद्देमाल पुढीलप्रमाणे . .
रु. ४९.९२०/-
१) बनावट देशी दारू टेंगोपंच १८० मिलीच्या एकूण ९६० सिलबंद
बाटल्या प्रती बाटली रु.५२/- प्रमाणे.
रु. ६९.१२०/ २) इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्की १८० मिलीच्या एकूण ५७६ सिलबंद
बाटल्या प्रती बाटली रु.१२०/-प्रमाणे.
रु. १२,०००/ ३) किंगफिशर बिअर ५०० मिलीच्या एकूण ९६ बाटल्या. प्रती
बाटली रु.१२५/- प्रमाणे.(:… …….-:
रु. १२,०००/- ४) टूबर्ग बिअर ५०० मिलीच्या एकूण ९६ बाटल्या. प्रती बाटली
रु.१२५/- प्रमाणे.( .–.
रु. २,००,०००/- ५) तवेरा गाडी क्र. MH 12 FC-4386 /-ची अंदाचे किंमत.
रु. ३,४३,०४०/-
एकूण अंदाजे मुद्देमाल किंमत सदरची कार्यवाही बी.आर.नवले,प्र.निरीक्षक रा.ऊ.शु भरारी पथक, दुय्यम निरीक्षक,एस.स.नजन,बी.एस.महाडि क,निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
के.एन.गायकवाड,दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, साक्री, एस.एस.गोवेकर,सहा.दु.निरीक्षक, तसेच जवान ,ए.व्ही.भडागे, के.एम.गोसावी, आर.एन.सोनार, के.दि.वराडे, डी..टी.पावरा, वाहन चालक व्ही.बी.नाहीदे,एन.डी.मोरे यांचे पथकाने सदरची कार्यवाही केली असून पुढील तपास भरारी पथक निरीक्षक प्र. बी.आर.नवले हे करीत आहे.