
धुळे: स्वच्छता मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व दालने चकाकली
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारला त्यानंतर लगेचच अवैध धंद्यांवर धाडीसत्र सुरू केले यामुळे अवैध धंदे वाल्यांचे कंबरडेच मोडले.
‘एकीचे बळ मिळते फळ ‘या उक्तीप्रमाणे आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.माणसाच्या मनगटात ताकद असते त्याप्रमाणे पोलीस ठरवतो ते करून दाखवतो सगळ्यांचे सहकार्य लाभले तर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी सगळ्यांनी एकदिलाने एकजुटीने कार्य केले पाहिजे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहील हाच संदेश या स्वच्छता मोहीमेतून धुळेकर नागरिकांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिला.
‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ याअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज मंगळवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सकाळी सात ते नऊ दोन तासांमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागातील दालनातील कर्मचाऱ्यांनी झाडलोट करून कचरा व धुळ गोळा केली. जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधिकारी यांनी हि स्वच्छता मोहीमेत सहभाग घेत हातात झाडू घेऊन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सोबत स्वच्छता केली. बऱ्याच महिन्यांपासून कार्यालयातील फाईलवरील धुळ व कचरा सात झाला नव्हता तो या मोहिमेतून स्वच्छतेतून साफ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेतून अधिकारी व कर्मचारी यांना आनंद मिळाला. दालने ही स्वच्छतेमुळे चकाचक झाली.
स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय आवारात अधिकारी व कर्मचारी एकत्र झाले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर भुजबळ यांनी या मोहिमेतून अधिकारी व कर्मचारी यांना काय साध्य झाले याविषयी आपले मत व्यक्त करण्यास संधी दिली. चांगला उपक्रम आहे आम्हाला ही चांगली सवय लागली.चांगला पायंडा घातला असे मत तीन,चार कर्मचारी अधिकारी यांनी व्यक्त केले .
अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ यांनी स्वच्छते विषयी माहिती देताना सांगितले की आपण गुटखा खातो.व आवारात थुंकतो अस्वच्छता होते. थुंकी वाटे संसर्गजन्य रोग पसरतो गुटखा खाल्ल्याने आरोग्याला अपाय होतो गुटखा खाऊ नका.स्वच्छता राखा असे आव्हान केले.
‘स्वतःच्या घरापासून’आपण हि सुरुवात करतो आहोत. पोलीस कर्मचारी हा कुठल्या कार्याला नाही म्हणत नाही सदैव त्यांचा होकार असतो. माणसाच्या मनगटात ताकद असते. पोलिस कर्मचाऱ्याच्या हि मनगटात चांगली ताकद आहे. सगळे एकजूट होऊन चांगले कार्य करून दाखवू जिल्ह्यापासून सुरुवात केलीये अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे पालन करून त्या-त्या भागातील व त्याच्या तालुक्यातील पोलीस स्टेशन आवारात हि मोहीम राबवतील स्वच्छ ठेवतील.कार्यालय स्वच्छ असले तर आपल्याला कार्य करण्यास प्रसन्नता वाटते. गुटखा खाऊ नका आवारात थूंकू नका. अस्वच्छता होईल असे करू नका. असे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल .500 रुपये दंड करण्यात येईल. व्यसनांपासून कर्मचारी-अधिकारी दूर रहावे.संसर्गजन्य रोग होऊ नये याकरता ही स्वच्छता मोहीम आपण राबविली या सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी हे शक्य झाले. स्वच्छतेचे विषयी जनजागृतीसाठी फलक लावण्यात येतील. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली.
स्वच्छता मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, व 20 अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील 35 कर्मचारी आणि पोलीस महिला व पुरुष असे 100 कर्मचारी उपस्थित होते.