
धुळे : ‘द बर्निग ‘ टॅक्टर ट्रॉलीसह कोरडा चारा जळून हजारो रुपयांचे नुकसान!
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): तालुक्यातील रावेर जुन्नर रस्त्यावर ‘द बर्निग ‘ टॅक्टर ट्रॉलीसह कोरडा चारा जळून हजारो रुपयांचे नुकसान.
याबाबत मिळालेली माहिती की,आज दुपारी दिड ते दोन वाजेदरम्यान गंगाराम गवळी शेतकरी हे जुन्नेर गावातून टॅक्टरसह ट्रॉलीत गुरांना लागणारा कोरडा चारा भरून लळींग गावाकडे जाताना गावा बाहेर पुढे जाताना रस्त्यावर काही अंतरावर ट्रॉलीत भरलेल्या कोरड्या चाऱ्याला अचानक पणे आग लागली.आगीची माहिती मनपा अग्निशामक कार्यालयात देण्यात आली.माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.लिडींग फायरमन पांडुरंग पाटील,योगेश मराठे,चालक नरेंद्र बागुल यांनी जळणाऱ्या चाऱ्यावर पाणी करत दहा ते पंधरा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.यात अंदाजे 30 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुका पोलिस ठाण्यात उशीरा पर्यंत अग्नि उपद्रव 3 व 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.