
धुळे: दैठणकर नगर गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
धुळे: दैठणकर नगर गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
धुळे (तेजसमचार प्रतिनिधि): धुळे दैठणकर नगरात राहणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली. याबाबत मिळालेली माहिती की वाडीभोकर रोडवरील दैठणकर नगरात राहणाऱ्या 22 वर्षीय मेघराज बैसाणे तरुणाने घरात कोणी नसताना घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत जाऊन पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली रुणाची आत्महत्या ची बातमी परिसरात वार्यासारखी पसरली नागरिकांनी घरासमोर गर्दी केली होती.
आत्महत्याची माहिती पोलिसांना देण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घराचे दार तोडून परिस्थितीची पाहणी करून मेघराज बैसाणेला चक्करबर्डी येथील जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांन सोबत पाठवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तरूण मृत झाल्याचे नातेवाईकांना सांगितले.
नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह पोस्टमार्टम साठी शवविच्छेदन कक्षाकडे पाठविण्यात आला.तरुणाने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कुठलीही नेमके कारण कळू शकले नाही. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत आत्महत्या बाबत नोंद करण्याचे काम सुरू होते.