
धुळे: शिरूड गावातून एटीएम चोरुन नेणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या
शिरूड गावातून एटीएम चोरुन नेणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या
एक लाख रोकड जप्त केली.अन्य आरोपी फरार.
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि) : शिरुड गावात पंधरा दिवसांपूर्वी पाच चोरट्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन चोरट्यांनी मध्यरात्री ओरबाडून नेले होते. त्यानंतर दोन दिवसांनी डोंगराळ परिसरातील मोकळ्या जागेत चोरट्यांनी चोरलेली महिंद्रा पिकअप गाडी सोडून पळून गेले होते.व पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीचा आधारे तपास घेत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर दोन दिवसातच चोरट्यांनी एटीएम चोरून नेले होते. यात 14,07,500 रुपये रोकड लंपास केली होती. यापैकी चोरट्यांकडून एक लाख रुपये रक्कम जप्त केली आहे. व रानमळा परिसरात असलेल्या नवकार नगरातील मोकळ्या जागेतील विहिरीत एटीएम मशीन चोरट्याने फेकून दिले होते तेही पोलिसांनी जप्त केले आहे.
चोरट्याकडून एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरलेला लोखंडी हातोडा,छनी, इलेक्ट्रिक कटर त्याची पाती, अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. अन्य चार चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वेगळे पथक पुढील तपास करत आहेत अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी टिंमवर्क करत ही कामगिरी केलेली आहे. विशेष मोहीम राबवत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे.
या कामगिरीबद्दल त्यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
चोरटा हा मोहाडी येथील राहणारा असून त्याचे नाव चॅम्पियन सिंग मिलन सिंग भदा याला मालेगाव रोडवर महिंद्रा पिकपक गाडी चोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे व त्याचे
वडील यांचा सिन्नर येथील एटीएम मशीन चोरीत सहभाग आहे.त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.यांना परराज्यातील चोरट्याची मदत आहे.अन्य बाबींचा पोलिस तपास करीत आहे.अन्य गुन्हे लवकरच उघडकीस येतील.
अन्य आरोपींना लवकरच गजाआड करु असा आत्मविश्वास त्यांनी माहिती देताना व्यक्त केला.
सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित ,अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ, स्था.गु.शा.पो.नि.शिवाजी बुधवंत व त्याचे पथकातील सपोनि उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनूमान उगले, अनिल पाटील,असई नथ्थू भांबरे, सुनिल विंचूरकर, रफिक पठाण, विजय सोनवणे,कुणाल पानपाटील,उमेश पवार, संदीप थोरात,प्रभाकर बैसाणे,श्रीकांत पाटील , गौतम सपकाळे, अशोक पाटील, राहुल सानप, महेश मराठे,योगेश जगताप,विलास पाटील, केतन पाटील.यांनी हि कारवाई केली आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.