
धुळे : 60 लाखात कलेक्टर बंगल्या समोरचा रोड होणार चकाचक,
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). धुळे शहरातील जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान समोरील रस्ता वर्दळीचा आहे. बरेच महिन्यांपासून रस्त्याची दुरावस्था झालेली होती. रस्ता दुरुस्तीसाठी काही नागरिकांनी भिकमांगो आंदोलन केले. रस्ता दुरुस्त होण्यासाठी महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौर यांनी नगरौत्थान योजने अंतर्गत रस्ता काम दुरुस्ती करता पाठ पुरवा केला.या रस्त्या कामाला मंजुरी मिळाली.
आज सकाळी अकरा ते साडे अकरा च्या दरम्यान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी केली. व त्यांच्या हस्ते कालिका माता मंदिर ते जुने जिल्हा रुग्णालय पर्यंत रस्ता डांबरीकरण कामास मंजुरी मिळाली.सदर रस्तावर 60 लाख रुपये दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार यांनी दिली.
या रस्ता कामाचे भूमिपूजन खासदार डॉक्टर सुभाष भामरे,जिल्हाधिकारी गंगाधर डी ,आयुक्त अजित शेख, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर ,शहर अभियंता कैलास शिंदे, अमोल मासुळे ,कांतीलाल दाळवाले, गुड्डू अहिरराव, सीएम ओगले,राहुल तारगे व कार्यकर्ते पदाधिकारीही आदी उपस्थित होते.