
धुळे: वैद्यकीय महाविद्यालयात आणखी 26 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
धुळे (तेज समाचार डेस्क) : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल आणखी 26 रुग्णांचे कोरोना विषाणूचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित अहवालाचे काम प्रगतीत आहे. तसेच धुळे येथील एक महिला नाशिक येथे कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह आढळून आली आहे,
असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.