धुळे: पारोळा चौफुली जवळ कच्चा माल जळून खाक-लाखों रुपयांचे नुकसान

Featured धुळे
Share This:

धुळे: पारोळा चौफुली जवळ कच्चा माल जळून खाक-लाखों रुपयांचे नुकसान

धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा महामार्गावरील पारोळारोड चौफुली जवळील कृषी महाविद्यालय बायपास रस्ता वर गुजरात येथून आलेले मजूर कच्चा माल आणून झाडु तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करतात.लॉक डाऊन सुरू होण्या आधीच जादाचा कच्चा माल मजूरांनी गोळा करून ठेवला होता.काल मध्यरात्री अचानकपणे ह्या झाडुच्या कच्च्या मालाला अचानकपणे आग लागली.आगीने रौद्र रूप धारण केले.यावेळी हि बाब तिथेच काही अंतरावर बाजूला झोपलेल्या मजूराच्या लक्षात आले.त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.याच दरम्यान मार्गाहुन जाणाऱ्या पोलीस गाडीतील अधिकारी व कर्मचारी यांना दिसली.त्यांनी आगीवर पाणी मारा करण्यासाठी मनपा अग्निशामक दलाला आझादनगर पोलीसांनी खबर दिली.काही मिनिटात मनपा अग्निशामक दलाची एक गाडी क्रं.एम एच 18 एफ – 0258 घटनास्थळी दाखल झाली.फायरमन कुणाल ठाकुर, योगेंद्र जाधव , सचिन करनकाळ, वाहन चालक विलास बडके.यांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
परंतु या आगीत मजुरांच्या कच्च्या मालाचे लाख ते दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
आगी बाबत आझादनगर पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रव 3 व 7 प्रमाणे उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *