
धुळे: रेशन दुकानाचा परवाना कायमचा रद्द – काळ्या बाजारात विकत होते तांदूळ
धुळे: रेशन दुकानाचा परवाना कायमचा रद्द – काळ्या बाजारात विकत होते तांदूळ
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): मौजे पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे येथील रास्त भाव दुकान क्र. 16 या दुकानाचा पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत प्राप्त झालेला मोफत तांदुळ पात्र लाभार्थ्यांना वितरीत न करता काळया बाजारात विकण्याचा गंभीर प्रमाद दुकानदार श्री. अशोक मरसाळे यांनी केल्यामुळे त्यांचेवर व त्यांच्या मुलावर पुरवठा निरीक्षक पिंपळनेर यांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर दुकानाचा रिपोर्ट तहसिलदार साक्री यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयात केल्यानंतर श्री. अशोक मरसाळे यांना नोटीस बजावुन खुलासा मागविण्यात आला होता. तहसिलदार साक्री आणि श्री. मरसाळे यांच्या खुलाश्यावरुन श्री. अशोक मरसाळे यांच्या दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्य करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने केलेली आहे.