
धुळे : सिद्दिकी नगरातील गोडावूनवर छापा टाकून लाखोचा माल पोलिसांनी जप्त केला
धुळे (विजय डोंगरे ): गोडाउन मध्ये साठा करून ठेवलेले कातडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने एलसीबी पथकाने छापा टाकून जप्त केले आरोपी फरार.
जिल्ह्यात अवैध धंद्ये करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई आज शनिवारी सायंकाळी झालेल्या कारवाई मुळेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांना एका नागरीकाने गोपनिय माहिती दिली.त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी कारवाई चे आदेश दिले. मिळलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस पथक तिरंगा चौकातील सिद्धिकी नगरातील एका गोडावून जवळ दाखल झाले या ठिकाणी एका ट्रकमध्ये कातडे भरण्याचे काम सुरू होते पोलिसांना पाहताच तेथील काही जण फरार झाले पोलिसांनी त्यानंतर तेथून तो ट्रक व तिथे सापडले कातडे ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अगोदरच पदभार घेतला त्याच वेळी सांगितले होते की शहरातील अवैध धंदे बंद राहणार त्यानुसार हि धडाडीची कारवाई केली आहे.
सदर कारवाईत अडीच ते तीन लाखांचे कातडे असा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केलेला आहे
याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.