आयएसओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस ठाण्यातील लाच खोर उपनिरीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने जाळ्यात

Featured धुळे
Share This:

आयएसओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस ठाण्यातील लाच खोर उपनिरीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने जाळ्यात

धुळे(विजय डोंगरे): आयएसओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस स्टेशन मधील उपनिरीक्षक सचिन प्रभाकर गायकवाड यांना चाळीस हजाराची लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या घटनेमुळे जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली.

यानंतर लगेच हि बाब वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आली.माहिती मिळताच तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन अहिरे यांनी आयएसओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस स्टेशनला भेट दिली.उपनिरीक्षक अधिकारी यांनी केलेले गैरवर्तन प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक हे पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षकांवर कडाडले गैरवर्तनामुळे खात्याची व जिल्ह्याची बदनामी होते.काही वेळ माहिती घेऊन परत ते अधिक्षक कार्यालयकडे रवाना झाले.

याबाबत मिळालेली माहिती की यातील तक्रारदार यांचे धुळे येथील राहते घर एका व्यक्तीने खोट्या सह्या करुन बळकावाले होते त्याबाबत तक्रारदार यांनी त्या अनुशंगाने तक्रार अर्ज उपनिरीक्षक यांचेकडे चौकशीस दिला होता,त्या अर्ज चौकशीत कारवाई करणेसाठी अधिकारी ने तक्रारदार यांचेकडे आज दि.03 मंगळवारी 50000/-रु. लाचेची मागणी करून तड़जोडी नंतर 40000/- रुपये डमी नोटा लाचेची मागणी करून रोख रक्कम घेताना आय एस ओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस स्टेशन मधील उपनिरीक्षक सचिन गायकवाड लाच खोर अधिकारी याला सापळा रचून नाशिक येथील अॅन्टी करप्शन ब्युरो पथकाने ताब्यात घेतले.मोहाडी पोलीस ठाण्यात गायकवाड यांची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
सदर कारवाई ला.प्र.वि. नाशिक. पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे.यांचे मार्गदर्शनाने

पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे, पोलीस हवालदार सुकदेव मुरकुटे,पोलीस हवालदार सुनील गीते , पोलीस नाईक मनोज पाटिल, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे आदींनी ही कारवाई केली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *