
धुळे: शहरात सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत पॉवरलुम व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दया -डॉ. फारूक शाह
शहरात सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत पॉवरलुम व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दया आमदार डॉ. फारूक शाह यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि).: सध्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे धुळे शहरातील सदयस्थिती बघता अनेक गोर-गरीब, कष्टकरी व कामगारांचे काम धंदे व लहान व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक स्त्रोत बंद झाला आहे यामुळे गरीब व कष्टकरी कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे. आजची कोरोना बाबतचे राज्य सरकारचे निर्देश पाहता ५ ते १० टक्क्यांच्या कर्मचारी संख्येवर नियमांचे पालन करत आपले लघु उद्योग सुरु करावेत असे आदेशित आहे. याच अनुषंगाने धुळे शहरात पॉवरलुम धारकांकडे मोठ्या प्रमाणावर कामगार व मजूर वर्ग काम करतो. त्यांच्या हाताला काम म्हणून व त्यांची होत असलेली उपासमारी सारखे व इतर समस्या दूर करण्यासाठी सोशल डीस्टन्सिंग चे पालन करत पॉवरलुम व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. यामुळे अनेक गोर-गरीब, कष्टकरी व कामगारांचे काम पूर्ववत सुरु होऊन लघु उद्योगांना चालना मिळेल व जनतेमध्ये एक समाधानाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल अशी मागणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत आमदार डॉ.फारूक शाह यांनी केली.
यावेळी आमदार डॉ. फारूक शाह, खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी संजय यादव, निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय दंडाधिकारी भीमराज दराडे, मनपा आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, उपायुक्त गणेश गिरी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, हर्षकुमार रेलन, विरोधी पक्ष नेते साबीर शेठ, तहसीलदार संजय शिंदे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील आदी लोकप्रतिनिधीसह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.