
धुळे: अवैधरित्या घरगुती गॅसचा साठा 8 सिलेंडर जप्त एक आरोपी गजाआड. एलसीबी ची कामगिरी
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि).स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना खबरी मार्फत गोपनीय माहिती मिळाली. त्याद्वारे त्यांनी एक पोलीस पथक तयार करून छापा टाकून अवैधरित्या घरगुती गॅस चा साठा व इलेक्ट्रिक मोटर,वजन काटा असा हजारोंचा माल जप्त केला.
याबाबत माहिती की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिदायत मशीद पाठीमागील शंभर फुटी रस्त्यावर मोईन उस्मान पिंजारी राहणार चाळीसगाव रोड जामचा मळा शंभर फुटी रस्ता चाळीसगाव रोड वरील व्यक्ती अवैधरित्या इलेक्ट्रिक मोटर च्या साह्याने घरगुती वापरातील गॅस सिलेंडर मधून ऑटो रिक्षा व चार चाकी गॅस वर चालणारे वाहने यांच्यांत गॅस भरून देण्याचे अवैधरित्या काम करतो. मिळालेल्या गोपनीय माहितीची पोलिसांनी शहानिशा केली असता त्यात सत्यता आढळून आली.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकून 44,500 रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
यात घरगुती वापरातील एच पी कंपनीचे आठ सिलेंडर,इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक वजन काटा ,नोजल, नळ्या अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
मोईन उस्मान पिंजारी यांचे विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात पो कॉ राहुल सानप यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांचे मार्गदर्शनाने सपोनि उमेश बोरसे असई नथ्थू भांबरे,पो.कॉ रफिक रशिद पठाण,पो.कॉ संदीप थोरात,पो.कॉ तुषार पारधी,पो.कॉ,राहुल सानप,पो.कॉ श्रीशेल पाटील,पो.कॉ चेतन पाटील, पो.ना. वसंत गोकुळ पाटील, पो.ना. गौतम सपकाळे आदींनी ही कामगिरी केली आहे.