धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). शहरात सद्य स्थितीत मनपा मार्फत डुक्कर व कुत्रे पकडण्याचा ठेका देण्यात आला आहे. परंतु ज्या कंपनी मार्फत हे काम करण्यात येत आहे, ते फक्त मोकाट डुक्कर उचलत असून कुत्रे पकडत नाही आहे. यापूर्वी वारंवार बेवारस व मोकाट व पिसाळलेल्या कुत्रांना पकडण्यासाठी स्थायी समितीमध्ये व महासभामध्ये विषय घेतला होता. तसेच वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या बातमीनुसार डुक्कर व कुत्रे पकडण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कुत्रे पकडले जात नसून फक्त डुक्कर पकडण्यात येत आहे. शहरात मोठया प्रमाणात मोकाट कुत्रे आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार मोकाट कुत्रे पकडण्यात यावेत.
ठेक्यानुसार मोकाट कुत्रे पकडण्याबाबत संबंधित ठेकेदाराला त्वरीत आदेश द्यावेत.याबाबत लेखी निवेदन समाजवादी पार्टी चे नगरसेवक पटेल मोहम्मद अमीन अब्दुल करीम यांनी आयुक्त अजीज शेख यांना दिले आहे. यावेळी मुक्तार मंन्सूरी, शब्बीर पिंजारी, सलीम टंकी अल्ताफ शेख उपस्थित होते.
12 फेब्रुवारीला शहरात कोईमतुर येथून महानगरपालिकेच्या वतीने कुत्रे पकडण्यासाठी पंधरा लोकांना बोलवले होते. त्यांनी शहरातील विविध भागात सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आठ ते दहा ठिकाणी फिरून ऐंशी ते शंभर कुत्रे बंदिस्त केले.परंतु हा ठेका वादग्रस्त ठरला यांना कुत्रे नाही तर डुक्कर पकडण्यासाठी सांगितले होते. आणि त्यांनी कुत्रे पकडले त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा प्रय़ोग थंडावला पाच दिवस होत नाही. तोच नगरसेवकांनी शहरात पुन्हा मोकाट कुत्रे व डुक्कर त्रासामुळे नागरिक त्रस्त झालेले.नागरीक नगरसेवक यांचेकडे तक्रारी करतात.नगरसेवक नागरीक तक्रारी ने हैराण झाले आहेत. ठेकेदाराला सांगून या मोकाट डुक्कर आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नगरसेवक कडे करतात.परंतू समस्या सुटत नाही.परिस्थिती जैसे थे. नक्की पाणी कुठे मुरते आहे. याबाबत नागरिक उलट सुलट चर्चा सुरू आहे.