
धुळे: ‘ द बर्निंग’ रेसिंग बाईकचा थरार !
गल्ली नंबर 5 च्या बोळींज ‘ द बर्निंग’ रेसिंग बाईकचा थरार
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे शहरात गल्ली नंबर पाच मधील बोळीत अज्ञातांनी एक रेसर बाईक जाळुन टाकली. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले रेसर बाईक जळत असल्याचे परिसरातील काही नागरिकांनी पहिले यावेळी उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. याबाबत नेमके कारण अद्याप कळलेले नसून याचा तपास पोलीस करीत आहेत.
रेसर बाईक का कोणी केव्हा कशी झाली याबाबत कोणालाही माहिती नाही परंतु एकदमच गल्लीत जळत असलेली बाईक पाहून परिसरात खळबळ उडाली व धावपळ झाली.जळती रेसिंग बाईक पाहून भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाची एक गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली व आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. यात रेसर बाईक पूर्णपणे जळून खाक झाली होती. फक्त गाडीचा लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला होता गाडीची किंमत अंदाजे दीड ते दोन लाख रुपये असल्याचे समजते .
माहिती कळताच आझादनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली गर्दी लाही घटनास्थळावरून पांगले पुढील तपास आझादनगर पोलिस करीत आहेत.