
लुपिन फाउंडेशन च्या वतीने धुळे महानगरपालिका 5 स्कॅनर मशीन देण्यात आलेले
धुळे (तेज समाचार डेस्क): कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका उपाययोजना करण्यासाठी मदत मिळत असून आज लुपिन फाउंडेशन च्या वतीने धुळे महानगरपालिका 5 स्कॅनर मशीन वैद्यकीय तपासणीसाठी देण्यात आलेले आहेत
धुळे शहरात अनेक सामाजिक व सेवाभावी संस्था आपापल्या परीने या जागतिक आपत्तीच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून विविध पातळीवर मदत करीत आहेत.. आहे आज धुळ्यातील लुपिन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने धुळे महानगरपालिका रुग्णांच्या नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी प्रत्येकी सात ते आठ हजार रुपये किमतीचे 5 थर्मल स्कॅनर मशीन देण्यात आले सदरचे मशीन आज महापौर श्री चंद्रकांत होणार व आयुक्त श्री अजीज शेख यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत सुपूर्द करण्यात आले
याप्रसंगी संस्थेचे योगेश राऊत संदीप झनझणे संदीप कुलकर्णी उपायुक्त श्री गणेश गिरी आरोग्याधिकारी डॉक्टर महेश मोरे मुख्य लेखा अधिकारी नामदेव भामरे उपमुख्य लेखा परिक्षक श्री दिपक कांत वाघ सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर विनायक कोटे आदी अधिकारी उपस्थित होते