
धुळे : कोरोना आजाराने मयत झालेल्या नागरिकांच्या दफन व दहनविधीसाठी जागा निश्चित करण्यासाठी बैठक
धुळे : कोरोना आजाराने मयत झालेल्या नागरिकांच्या दफन व दहनविधीसाठी जागा निश्चित करण्यासाठी बैठक
धुळे (तेज समाचार डेस्क) : धुळे महानगरपालिका हद्दीत कोरोना आजाराने मयत झालेल्या नागरिकांच्या दफन व दहनविधीसाठी धुळे महानगरपालिका हद्दीतच शासन निर्देशानुसार जागा निश्चित करण्यासाठी आज दिनांक 12 एप्रिल रोजी धुळे महानगरपालिका स्व अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महापौर चंद्रकांत सोनार आयुक्त श्री आजीज शेख यांच्या उपस्थितीत मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टच्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली
शासन निर्देशानुसार ज्या ठिकाणी जास्त नागरिकांचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी त्या नागरिकांचे दहन दफन विधी करावा असा निर्णय घेण्यात आलेला आहे मृत शरीराच्या वाहतुकीमुळे अन्य ठिकाणी संसर्ग पोहोचू नये व या रोगाचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी सदर निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने शहरात खाजगी कब्रस्तान असल्याने तेथील कबरस्थान प्रमुखांची बैठक आज रोजी महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली होती. यात सर्वांशी विचारविनिमय करून वडजाई रोड हायवे लगत असलेल्या कबरस्तान ची जागा निश्चिती करण्यात आलेली आहे यासाठी सर्वांनी सर्वसंमतीने यास मान्यता दिली आहे तसेच मृतांचा दफनविधी योग्य त्या शासकीय नियमांचे पालन करून करण्यात यावा याबाबत आयुक्त अजीज शेख यांनी उपस्थितांना सुचित केले.
याप्रसंगी बोलताना महापौर श्री चंद्रकांत सोनार यांनी आजतागायत सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार व्यक्त करून यापुढेही प्रतिबंधात्मक कार्यवाही सर्वांनी जबाबदारी घेऊन पुढे यावे व यापुढे मनपा मार्फत थर्मल स्कॅनर मशीन द्वारे प्रत्येक घराघरात होणाऱ्या तपासणीसाठी ही सर्वांनी समाज प्रबोधन करून सहकार्य करावे असे आव्हान याप्रसंगी केले या बैठकीस विरोधी पक्षनेते श्री साबीर शेठ माजी उपमहापौर श्री संवाद अन्सारी नगरसेवक वसीम बारी उपायुक्त श्री गणेश गिरी सहाय्यक आयुक्त श्री शांताराम गोसावी श्री विनायक कोते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसी पाटील आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव तसेच देवपूर कबरस्तान प्रमुख असदुद्दीन खाटीक कुमारनगर कब्रस्तान प्रमुख श्री आरकर आली. कारे कब्रस्तान प्रमुख हुसेन व अन्य कब्रस्थान चे प्रमुख उपस्थित होते