धुळे: स्थानिक गुन्हे शाखा ने पकडला 53000 किमतीचा गुटका

Featured धुळे
Share This:

धुळे: स्थानिक गुन्हे शाखा ने पकडला 53000 किमतीचा गुटका

धुळे  (तेज समाचार प्रतिनिधि ) : दिनांक 02/05/2020 रोजी  माननीय पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की भंगार बाजार 80 फुटी रोड अन्सार नगर लगत असलेले जमीर रियाज तांबोळी याने महाराष्ट्र शासन ने बंदी केलेले सुगंधीत पान मसाले विमल गुटका ची चोरटी विक्री करीत आहे.
       टीम मधील पोसई/ हनुमान उगले, पोहेकॉ/ रफिक पठाण, पोना/ गौतम सपकाळे, पोकॉ/ राहुल सानप, चालक/ विलास पाटील, अश्यांना बातमीच्या ठिकाणी पाठवले असता तिथे एका पत्र्याच्या शेड मध्ये विमल  गुटका जप्त केला असून  सुमारे 53,064/- रुपये किमतीचा माल जमा केला आहे
  व अन्न औषध विभाग धुळे येथे पुढील कारवाई करीत आहेत
 *सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित ,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या सूचनाने व मार्गदशनाने पोसई हनुमान उगले, पोहेकॉ/ रफिक पठाण, पोना/गौतम सपकाळे,पॉकॉ/ राहुल सानप , चालक/ विलास पाटील आदी नी केली आहे*..
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *