
धुळे: LCB पथकाने छापा टाकून पत्त्यांचा रंगलेला डाव उधळला 2 ताब्यात 3 फरार हजारो रुपयांची रोकड जप्त
धुळे: LCB पथकाने छापा टाकून पत्त्यांचा रंगलेला डाव उधळला 2 ताब्यात 3 फरार हजारो रुपयांची रोकड जप्त
धुळे (तेज समाचार प्रतिनिधी): देशात लॉक डाऊन असतानाही व शहरात जमाव बंदी लागू असताना. शहरातील पश्र्चिम देवपूर भागातील नकाणे गावात एका पत्रटी शेड मध्ये पैसे लावून पत्त्यांचा खेळ सुरू आहे.अशी माहिती एका खबरी ने पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दिली.मिळालेल्या माहिती व ठिकाणी बुधवंत यांनी उपनिरीक्षक अनिल पाटील व पोलीस कर्मचारी यांना छापा टाकण्यास सांगितले.पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी हे नकाणे गावात अमरधाम जवळ असलेल्या प्लॉट मधील पत्रटी शेड जवळ पोहचले तेव्हा शेड मध्ये पाच ते सहा जण पैसे लावून पत्त्याचा डाव खेळण्यांत दंग झालेले असताना छापा टाकला यावेळी त्यातील सगळ्यांनी पोलीसांना पहाताच तेथून निसटण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलीसांनी दोन जणांना पकडले व पत्त्यांचा रंगलेला डाव उधळून त्यांचे जवळील रोख रक्कम 25 हजार 500 रुपये व एक पत्र्याची कॅट असा माल एल सी बी पथकाने छापा टाकून जप्त केला आहे.
यशवंत सुरेश बागूल व प्रमोद भास्कर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विलास नामदेव पाटील,प्रमोद भास्कर पाटील,रा.नकाणे, यशवंत सुरेश बागूल रा.साक्री रोड हे तिघे जण फरार आहे.यांचा शोध सुरू आहे.पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ,स्था.गु.शा.पो.नि.शिवाजी बुधवंत यांचे मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील,असई नथ्थू भामरे,पो.कॉ.महेंद्र कापूरे, नितीन मोहने,मायुस सोनवणे,गौतम सोनवणे, विजय सोनवणे यांनी हि कारवाई केली आहे.